ट्रेकिंग करण्याचा 'हा' अजून एक फायदा...तुम्हाला माहित असलाच पाहिजे !


ट्रेकिंगचे चाहते काही कमी नाही. मात्र तरुणवयात कॉलेजला असताना असलेला ट्रेकिंगचा छंद पुढे लग्न आणि नोकरीमुळे काहीसा मागे पडतो. अनेक व्यक्ती तरुणपणी ट्रेकिंग करतात मात्र त्यानंतर सोडून देतात. ट्रेकिंगचे अनेक फायदे आहेत. नियमित ट्रेकिंग केल्यानं शरीराचे मसल्स मजबूत होता. तसंच अंगात एक वेगळी हिम्मत येत, शिवाय सहनशक्तीमध्येही वाढ होते. पण अलिकडेच ट्रेकिंगचा आणखी एक फायदा समोर आला आहे. तो म्हणजे ट्रेकिंगमुळे तुम्ही नैराश्यातूनही बाहेर पडू शकता. एका नव्या संशोधनातून हा दावा करण्यात आला आहे.

अमेरिकेतील अँरिजोना विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन केलं आहे. या संशोधनात त्यांनी जर्मनीतील शंभर ट्रेकरचा अभ्यास केला. तिथे काही हॉस्पिटलनं ट्रेकिंगचा एक उपचार पद्धत म्हणून वापर करण्यास सुरुवात केली आहे. या लोकांची दोन भागात विभागणी करून एकाला तत्काळ ट्रेकिंग करण्यास सांगितलं. तर दुसर्‍या गटाला त्यासाठी थोडे थांबवून ठेवले. यात खडक वा भिंतीवर दोराची मदत न घेता चढाई करायची होती. आठ आठवड्यांच्या या कोर्समध्ये प्रत्येक त्यांच्यातील प्रत्येकाला आठवड्याला तीन तास चढाई करायची होती. विविध बिंदूंवर त्यांच्या नैराश्याची पातळी जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी ‘बेक्स डिप्रेशन इन्व्हेंटरी’चा वापर केला.


या शंभर ट्रेकरचा दोन तुकडीत अभ्यास केल्यानंतर त्यांना दिसून आलं की उपचारादरम्यान तत्काळ ट्रेकिंग करणार्‍या समुहाच्या नैराश्य गुणांमध्ये 6.27 गुणांची सुधारणा दिसून आली, मात्र त्याच वेळी उशिराने चढाई करणार्‍या लोकांमध्ये केवळ 1.4 गुणांची सुधारणा झाली. गुणांतील ही घसरण मध्यम ते हलक्या नैराश्याच्या पातळीतील सुधारणा दर्शविते. नैराश्य एक गंभीर आजार असून अमेरिका व संपूर्ण जगभरात हा एक सामान्य मानसिक विकार बनला आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. त्यामुळे आता तुम्हीही नैराश्यात असाल तर नक्की ट्रेकिंग करा
थोडे नवीन जरा जुने