रक्तातील साखरेचे प्रमाण समतोल राखण्यासाठी ह्या काही खास टिप्स.


आजारपण : दुर्दैवाने आजारपण येणे ही नक्कीच वाईट परिस्थिती आहे आणि ती कोणाच्याही हातात नसते. पण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वरखाली होऊ शकते. फ्लू सारख्या आजारात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी खालावते. एवढेच नाही तर आजारपणावर औषध म्हणून अँटीबायोटिक गोळ्या घेतल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वरखाली होते. त्यामुळेच आजारपणाच्या काळात अधिकाधिक पाणी किंवा पेय पदार्थाचा समावेश असावा. पण त्यात साखर किंवा काचे प्रमाण कमीच असावे.

ताण - तणाव : आपल्याला कामाचे किंवा वैयक्क्तिक आयुष्याशी निगडीत कोणत्याही गोष्टीचा ताण आपल्यावर आल्यास शरीर नैसर्गिकरित्या ताणाशी निगडीत हार्मोन्स सवण्यास सुरुवात होते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

त्यावर उपाय म्हणून रिलॅक्सेशन टेक्नीक म्हणजे ताणमुक्तीचे तंत्र शिकून घेणे गरजेचे आहे. दीर्घ श्वास घेणे आणि मेडिटेशन यांच्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते आणि रक्तातील साखरेची पातळी पुन्हा योग्य पातळीवर स्थिरावते. अशा प्रकारे रक्तातील साखरेची पातळी समतोल ठेवण्यासाठी काही युक्त्या आपण करु शकतो.


शारीरिक हालचाली : बरेच जण नियमित पणे जिममध्ये जाऊन व्यायाम करतातच पण त्याशिवाय घरातील काही कामे नियमितपणे केल्यास शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. घरातील केरवारे करणे, बागेत काम करणे, साफसफाई करणे आदी कामांमुळे शारीरिक हालचाल होत असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि कमी होण्यास मदत करते.
थोडे नवीन जरा जुने