मनुकांबरोबर काजू, अक्रोड खाल्ल्याने काय होईल?
मनुका किंवा बेदाणा ही अर्धवट वाळलेली द्राक्षे असतात. मनुकांचे मुख्यत: हिरवे आणि पिवळे असे दोन प्रकार असतात.मनुका किंवा बेदाणा ही अर्धवट वाळलेली द्राक्षे असतात. मनुकांचे मुख्यत: हिरवे आणि पिवळे असे दोन प्रकार असतात. मनुका सहसा थॉमसन, सोन्नाक्का, ताशीगणेश, माणिक्यमान या जातींच्या द्राक्षांपासून बनवले जातात. माणिक्यमान ही द्राक्षं केवळ मनुका तयार करण्यासाठी पिकवतात.

मात्र सा-या द्राक्षांच्या मनुका होत नाहीत. अगदी गोड द्राक्षेच यासाठी निवडतात. मनुका फार पौष्टिक आहेत. प्राचीन काळापासून मनुका या टॉनिक म्हणून आहारात आहेत. भूमध्य समुद्रात त्यांचा वापर ग्रीक व रोमन काळापासून चालत आला आहे.

जगात अनेक ठिकाणी मनुका तयार केल्या जातात; पण त्यापैकी बहुतांश उत्पादन इटली, स्पेन, फ्रान्स, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया व आफ्रिका या ठिकाणी होते. मनुकांत पिष्टमय पदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे यांचे प्रमाण बरेच आहे. पाश्चात्त्य लोक सॅलेडमध्ये मनुकांचा वापर बराच करतात.

दुधाबरोबर मनुका घेतल्यास त्या शरीराची झीज भरून काढून ते शरीराला पुष्ट करतात. दुधातून प्रथिने व मनुकांतून शरीरास आवश्यक ती साखर मिळते.

मनुकांबरोबर काजू, अक्रोड व शेंगदाणे खाणे हिताचे असते.

बेकरीतील पदार्थ, बिस्किटे, केक, पेस्ट्रीज, जॅम, जेली यामध्ये मनुकांचा अधिक प्रमाणात वापर केला जातो.

मनुकांतील साखरेमुळे त्याची पौष्टिकता वाढते. मनुकांत द्राक्षांच्या आठपठ साखर मिळत असते.

मनुका शरीरात उष्णता व उत्साह निर्माण करतात.

मनुका खाल्ल्याने त्यातील जादा अल्कलीमुळे शरीरातील आम्ल संतुलित राहते.

रोज १.०५ ग्रॅम मनुका खाल्ल्यास लघवीतील आम्ले व अमोनियाही कमी होतो.

पोटाच्या तक्रारींसाठी लहान मुलांना रोज मनुकांचे पाणी द्यावे.

 रक्तातील लोह वाढवण्यास मनुका खाणे हा उत्तम उपाय असल्याने रक्तक्षयावर त्या उत्तम आहेत.

वजन वाढण्यासाठी ३० ग्रॅम एका वेळी अशा रोज १ किलोपर्यंत मनुका खाव्यात.

ताप कमी होण्यासाठी मनुकांचा अर्क घ्यावा.
थोडे नवीन जरा जुने