ही आहेत कारणे,डोळ्याखाली डार्क सर्कल तयार होण्यामागे,जाणून घ्या !


महिला त्यांच्या त्वचेबद्दल किती प्रमाणात जागरूक असतात हे सर्वांना माहितीच आहे. सध्या ब-याच महिलांना डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि आय बॅग्स या गोष्टी काळजीत टाकत आहेत. पुरेशी झोप घेतल्या नंतरही डोळ्याखाली काळी वर्तुळे आणि आय बॅग्स कशी तयार होतात असा प्रश्न महिला विचारताना आपण बघितल्या असतील. 

पण, या पाठीमागे झोप हे एकच कारण नसून अन्य कारणे देखील असण्याची दाट शक्यता असते. जनरल ट्रीटमेंट प्रोग्राम घेतल्याने या समस्येपासून सुटकारा मिळवता येणे शक्य आहे. ब-याच व्यक्तीच्या डार्क सर्कल मागे त्यांची फॅमिली हिस्ट्री देखील मुख्य कारण असू शकते. पण योग्य उपचाराने ही समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते हे नक्की.

ज्यास्त वजन , डायबेटीज़ आणि थायरॉइड यामुळेदेखील डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. डोळ्याखालील त्वचा नाजूक आणि पातळ असल्याने तसेच आपण वापरत असलेल्या कॉस्मेटिक्समुळे डोळ्याखाली लालसरपणा, पफ याचा त्रास होण्याची शक्यता दाट असते. क्रोनिक आजारामुळे देखील डोळ्याखाली लालसरपणा आणि सूज येऊ शकते.

 या समस्येपासू दूर राहण्याचे काही सोपे उपाय.
 
सर्वात प्रथम चेह-यावर सिटाफिल लोशन, विची अथवा क्लिनिक्यू फेसवॉश लावावा. हे लावल्याने चेह-यावर होणा-या रिअ‍ॅक्शनचे प्रमाण कमी होऊ शकते.
डोळ्यावर कमीत कमी आय-मेकअप जसे लायनर अथवा मस्कारा लावावा. तुम्हाला जर डोळ्याखाली अशा प्रकारचा मेकअप करायचा असेल तर एखाद्या ब्रॅन्डेड कंपनीच्या मेकअप-रिमूव्हरने ते काढून टाकावे.

डोळे जास्त चोळल्याने देखील पफनेस अथवा सुज येण्याची दाट शक्यता असते. डोळ्याखाली जास्त आग होत असल्यास डोळे गार पाण्याने धुतल्यास डोळ्याला आराम मिळण्यास मद होते.

घरगुती उपचार :

हळद आणि अननस ज्युस एकत्र करून डोळ्याखाली लावल्याने डार्क सर्कल कमी होण्यास मदत होईल.

ऑइलमंड ऑईलने डोळ्याच्या आजुबाजुला मसाज करावी. असे केल्याने डार्क सर्कल कमी होण्यास मदत होऊ शकेल. साधारण रोज 15 ते 20 मिनटे डोळ्याची मालिश करावी.

गावरान काकडी डोळ्यावर 15-20 मिनटे ठेवावी व नंतर हलक्या गरम पाण्याने डोळे धुवावे.

बटाटा आणि गावरान काकडी याचा रस एकत्र करून त्यामध्ये रूई टाकून डोळ्यावर 20 मिनिटे ठेवावी व नंतर गार पाण्याने डोळे धुवावे.

लिंबाचा रस आणि टमाट्याचा रस एकत्र करून डोळ्याच्या खाली लावावा आणि वाळल्यानंतर पाण्याने डोळे धूऊन टाकावे. असे दिवसातुन दोन वेळेस केल्याने डार्क सर्कल कमी होण्यास मदत होईल.

पुढील स्लाइडवर डार्क सर्कल कमी करण्यासाठी खाण्या-पिण्याच्या गोष्टींबद्दल...
पोषक आहार घ्यावा. रोजच्या आहारात फळे आणि भाज्या भरपूर प्रमाणात पोटात जातील याचे नियोजन करावे. ताजा ज्युस प्यावा. असे केल्याने चेह-यावरील तेच वाढेल तसेच डार्क सर्कल देखील कमी होतील.

दारू व धूम्रपानाचे सेवन करणे टाळावे. तसेच जंक फूड देखील खाणे टाळावे.

रोज कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्यावे. यामुळे बॉडी डीहायड्रेशन होण्यापासून वाचेल. तसेच डार्क सर्कल देखील तयार होणार नाही.

कमीत कमी 8 तास झोप घ्यावी. जास्त काळ उन्हात राहू नये.

 कुठल्याच प्रकारचे क्रिम डोळ्याखाली जास्त वेळ ठेऊ नये.
थोडे नवीन जरा जुने