लग्नात मानपान न दिल्याने केली विवाहितेला मारहाण !


संगमनेर : अकोले तालुक्यातील कोतुळ येथे एका विवाहित महिलेचा पती, सासू, सासरा, नणंद यांना महिलेच्या आई-वडिलांनी लग्नात मानपान दिला नाही. म्हणून त्या महिलेला मारहाण करत तिचा शारिरीक व मानसिक छळ केल्याची घटना दि. २८ डिसेंबर २०१८ ते दि. २ सप्टेंबर २०१९ या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोतुळ याठिकाणी ही विवाहित महिला आपल्या सासरी राहत आहे. दि. २८ डिसेंबर २०१८ ते दि. २ सप्टेंबर २०१९ या दरम्यान गरोदरपणाच्या खर्चापोटी माहेरून पन्नास हजार रुपये घेवून ये. तसेच तुझ्या आई-वडिलांनी लग्नात आम्हाला मानपान दिला नाही. या कारणावरून या विवाहित महिलेचा पती फारुख राजमहंमद शेख, सासरा राजमहंमद शेख (पूर्ण नाव माहित नाही), सासू रजिया राजमहंमद शेख (तिघे रा. भोंगळे हॉस्पिटल शेजारी, बोबडे कॉम्प्लेक्स, राहाता) व नणंद तस्लीम जमीर शेख (रा. वेस, ता. कोपरगाव) हे चौघे या महिलेला बेदम मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. 

तसेच तिच्या अंगावरील दाग-दागिने काढून घेवून तिला माहेरी काढून दिले. याप्रकरणी विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
थोडे नवीन जरा जुने