पपईचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित असायलाच हवे !


पपई एक चवदार, गोड आणि आरोग्यदायी फळ आहे. पपईत ए, बी, डी जीवनसत्वे आणि कॅल्शियम, प्रोटीन आदी तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. पपई खाल्याने पोटाचे रोग, हृदयरोग, आतड्यांचे रोग दूर होतात. पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पपईच्या रसाने अरूची, अनिद्रा, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आदी रोग दूर होतात.

पपईचे फायदे - 


पपई उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. कारण यामध्ये कार्पेन नावाचे क्षारयुक्त तत्व असते, जे उच्च रक्तदाबाला नियंत्रित करते. यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी पपईचे नियमित सेवन करावे.


नवीन चप्पल-बुट पायाला चावल्यास कच्च्या पपईच्या सालीचा रस पायाला लावल्यास आराम मिळेल.


हृदयाचा आजार असणाऱ्या लोकानी पपईच्या पानांचा एक कप काढा नियमित घेतल्यास फायदा होईल. पपईची भाजी करून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.


बद्धकोष्ठता, अ‍ॅसीडिटी अशा आजारांमध्ये पपई फायदेशीर ठरते. पपईत पपेन नावाचे एंजाईम असतं. त्याच्यामुळे पचनशक्ती वाढते.


पपईतून मिळणा-या व्हिटॅमिनमुळे त्वचा स्वस्थ आणि चमकदार होण्यासाठी मदत मिळते. युनिव्हर्सिटी ऑफ सेंट एंड्रेजच्या एका संशोधनानुसार पपई खाल्ल्यास त्वचा निरोगी राहते.


पपईच्या सेवनाने कमजोरी दूर होण्यास मदत होते. ज्या पुरुषांना विर्याशी संबंधित समस्या असेल पपई रामबाण उपाय आहे.


यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि कावीळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे पपई हे फळ आहे. कावीळ झालेल्या रुग्णाने दररोज पपईचे नियमित सेवन करावे. पपईमुळे पचनशक्ती वाढते.


पपईमध्ये मधुमेहाच्या रुग्णांसाठी लाभदायक असलेले फायबर भरपूर प्रमाणात असतं. पपईत असलेले फायबर कॅलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं.


पपईमुळे वीर्य वाढते. जखम लवकर भरून येते. मूत्रमार्गातील अडथळे दूर होतात. भूक वाढते. मूत्राशयाचे आजार दूर होतात. खोकल्यासोबत रक्त येत असल्यास थांबते.
थोडे नवीन जरा जुने