प्रजासत्ताक दिनी आसाम हादरलं


गुवाहाटी : आज आसाम चार शक्तिशाली ग्रेनेड हल्ल्यांनी हादरलं आहे . चारपैकी तीन हल्ले हे दिब्रूगड येथे झाले तर, एक हल्ला चरैदेव जिल्ह्यात झाला. ज्यामुळे आज  सकाळी आसाम अक्षरश: हादरलं.पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार  एका दुकानाजवळ एक स्फोट झाला, ज्या ठिकाणी पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. तर दुसरा एक स्फोट दिब्रूगड येथील गुरुद्वाऱ्यापाशी झाल्याची माहिती समोर येत आहे.

दुलीयाजान येथे झालेल्या आणखी एका स्फोटाची माहितीही पोलिसांना मिळाली. ज्याचा तपास अद्यापही सुरु आहे. विविध ठाकाणी झालेल्या या स्फोटांची माहिती मिळताच पोलीस पथकांनी तातड़ीने घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईला सुरुवात केली.
थोडे नवीन जरा जुने