आरामदाई झोपेला प्रसन्न करून घेण्यासाठी "हे" आहेत खास फंडे....

झोप हा माणसाचा अविभाज्य घटक. काहींसाठी प्रचंड आवडता तर, काहींसाठी गरजेपुरता. ज्यांचे झोपेचे गणीत पक्के त्यांच्या आरोग्यदाई आयुष्यात आनंदाचे स्थानही पक्के. झोपेवर नियंत्रण मिळवणाऱ्या लोकांना आयुष्यात यशही भरभरून मिळते. 


उदा. शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ ही काही आजच्या घडीची उदाहरणे. आयुष्यात झोप ही अत्यंत महत्त्वाची असते. कदाचीत म्हणूनच की काय ‘वर्ल्ड स्लीप डे’ ही साजरा केला जात असावा बहुदा. अशा या आरामदाई झोपेला प्रसन्न करून घेण्यासाठी हे आहेत खास फंडे. घ्या जाणून…

आपले बेड हा आपला दोस्त बनवा

तुम्ही झोपडीत राहता की मोठ्या राजमहालात याला काहीच महत्त्व नसते. महत्त्वाचे असते ते तुम्ही झोपत असलेल्या ठिकाणाची तुम्ही रचना कशी करता ते. तुम्ही तुमच्या बेडवर किंवा आंथरूणाला चांगले सजवा. त्यासाठी त्याच्या आजुबाजूला छानसा टेबल लॅम्प, पुस्तके किंवा तशाच काही छानशा वस्तू ठेवा. ज्या तुम्हाला आवडतात. आपले आंथरूण नेहमीच स्वच्छ ठेवा.

शरीराकडे ध्यान द्या

कोणती गोष्ट कोणत्या वेळी करायची याकडे लक्ष द्या. तुम्ही जर सकाळी व्यायाम केला नसेल. तर, संध्याकाळी नक्की करा. व्यायामासाठी तुम्ही वेळेच्या बंधनात अडकणे महत्त्वाचे नाही. तो नियमीतपणे होणे गरजेचे आहे. शरीराला योग्य व्यायाम मिळाल्यास छान झोप लागते.

डोळ्यांनाही आराम द्या

तुम्ही तुमच्या शरीराच्या इतर अवयवांची जितकी काळजी घेता तितकीच काळजी डोळ्यांचीही घ्या. रात्री उशीरपर्यंत जागरण करू नका. तसेच, रात्री झोपण्यापूर्वी किमान आर्धा तास टीव्ही, मोबाईल अश प्रकाशमाण गोष्टी पाहने शक्यतो टाळा. सतत प्रकाशमान वस्तूंकडे पाहू नका. झोप येत नसेल तर, हलके संगीतलावा.

पोटासाठी खा जिभेसाठी नको

अनेकांना आपल्या जिभेचे चोचले पुरविण्याची भारी हौस असते. फास्टफूड, कोल्ड्रींक्स, नमकीन पदार्थ, अती प्रमाणात मद्य किंवा मांस सेवन. चटपटीत खाने करतात. हे सर्व केवळ जीभेसाठी आहे. अती मसालेदार खाण्यामुळे पित्त वाढते. हलका आहार घ्या. जेणेकरून पोट साफ राहील. तसेच आपले वजनही आटोक्यात राहिल. खाण्यापीण्याकडे लक्ष दिल्याशिवाय झोपेचे गणीत जुळत नाही.

किती झोपला यापेक्षा कसे झोपला याला महत्त्व आहे

अनेक लोकांना झोप प्रचंड आवडते. काही महाभाग तर दिवसरात्र झोपायचे म्हटले तरी, तयार असतात. पण, उगाचच जास्त वेळ किंवा अगदीच कमी झोप फायद्याची नाही. प्रौढ व्यक्तीला कमीत कमी सलग सहा ते आठ तास झोपेची गरज असते. यात तुम्ही किती शांत झोपला ही गोष्ट फार प्रभावी ठरते.
थोडे नवीन जरा जुने