निर्भया' प्रकरणातील दोषी मुकेशची फाशी कायमनवी दिल्ली : निर्भया प्रकरणात  फाशीसाठी दोषी ठरविण्यात आलेल्या मुकेश सिंग याची दया याचिका  राष्ट्रपतींनी फेटाळून लावली आहे. ही दया याचिका यापूर्वी गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींकडे पाठवली होती. दरम्यान, गुरुवारी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी मुकेश याची दया याचिका फेटाळण्यात यावी, अशी शिफारस केली होती.
दरम्यान, त्याआधी दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी मुकेश याची दया याचिका फेटाळून लावली होती. या प्रकरणात, मुकेश याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याने खालच्या न्यायालयातील डेथ वॉरंट फेटाळण्याची मागणी या याचिकेद्वारे केली होती.
थोडे नवीन जरा जुने