गर्लफ्रेंडसोबत भांडण झालंय? या टिप्स फॉलो करा


गर्लफ्रेंडसोबत भांडण झाल्यानंतर तुम्ही तिचं मन जिंकण्यासाठी तसेच अबोला दुर करण्यासाठी प्रयत्न करतात मात्र, तुम्हाला यश मिळत नाही. पण अशावेळी काळजी करण्याची काहीच गरज नाही तर गरज असते ती म्हणजे समजुतदारपणाची. एकदम सोप्या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडचं मन जिंकू शकता. पाहूयात तर मग काय आहेत या टिप्स…

१) तुमची गर्लफ्रेंड आणि तुमच्यात ज्या कुठल्या कारणावरुन वाद झाला आहे त्या विषयावर शांतपणे बसुन चर्चा करा. दोघांनीही एकमेकांचं संपुर्ण म्हणणं ऐकूण घ्या. दोघांनीही एकमेकांचं बोलणं ऐकल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की, यामध्ये तुमची खरोखरचं चूक आहे तर कुठल्याही प्रकारची लाज किंवा कमीपणा न वाटून घेता गर्लफ्रेंडला सॉरी म्हणा. खरे बोलण्याने कुणाचंही नुकसान होत नाही आणि खरं बोलणं हे नेहमी चांगले असते.

२) दोघांमध्ये एखाद्या विषयावर चर्चा होत असताना लक्षात ठेवावं की, कुठल्याही प्रकारचा वाद होवू नये. कुठल्याही गोष्टीवर वाद होणं हे नेहमीच नुकसानदायक असतं. तसेच चुकी मान्य करणं म्हणजे सर्वकाही संपलं असे होत नाही. तर, तुमच्या जोडीदाराला या गोष्टीची जाणीव करुन द्या की, तुम्ही केलेल्या कृत्याचा खरचं तुम्हाला पश्चाताप होत आहे.

३) तुमच्या गर्लफ्रेंडला जाणीव करुन द्या की, ती तुमच्या आयुष्यातील एक महत्वाची व्यक्ती आहे. तसेच तुम्ही हे नातं आयुष्यभर प्रेमाने आणि प्रामाणिकपणे जगणार आहात. गर्लफ्रेंडचा हात पकडून या गोष्टी बोलणं खुपच प्रभावशाली ठरेल.

४) बोलता-बोलता अशा काही गोष्टी बोला की, ज्यामुळे तुमची गर्लफ्रेंड सर्व राग विसरुन जाईल आणि हसण्यास सुरुवात करेल. तुमची मस्करी करण्याची सवय किंवा जोक्स सांगण्याची सवय गर्लफ्रेंडचा राग शांत करु शकते.

५) अशा गोष्टी बोलणं टाळा की ज्यामुळे तुमच्या गर्लफ्रेंडला वाईट वाटेल. तसेच एखाद्या दिवशी डिनरचा प्लॅन बनवून तिला सरप्राइजही देऊ शकता.
थोडे नवीन जरा जुने