तांबड्या पेशी व पांढ-या पेशी बद्दल तुम्ही नेहमी ऐकता,जाणून घ्या पेशी असतात तरी काय?



पेशी हा मानवी रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. याचे मुख्य काम असते, रक्त पातळ होऊ न देणे, रक्तवाहिन्यांना नुकसान झाल्यास रक्तस्रावाला अटकाव आणणे.


रक्तात प्रामुख्याने तांबड्या पेशी, पांढ-या पेशी व प्लेटलेट्स हे घटक असतात. हे प्लेटलेट्स हाडांतील मज्जेत असणा-या मेगा कॅरॉसाईट्स, या पेशींपासून तयार होतात. 

प्लेटलेट्स या तीन ते चार दिवसांत नव्याने तयार होत असतात. जखम झाल्यावर जास्त रक्त वाहणे धोकादायक असते, अशा वेळी प्लेटलेट्स रक्तप्रवाहाला अटकाव करण्याचे काम करतात. शरीरात दीड ते साडेचार लाख प्लेटलेट्स असतात.

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी औषधे नसतात, प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी पोषक आहार व आराम करणे हा पर्याय असतो.

प्रमाणापेक्षा जास्त प्लेटलेट्स असणेही योग्य नाही. रक्तात प्लेटलेट्स जास्त प्रमाणात वाढले असेल तर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो, कारण यात रक्ताची गुठळी होण्याची शक्यता असते. यामुळे हृदयरोग, फुप्फुसांचे आजार होण्याची शक्यता असते. 

प्लेटलेट्स कमी झाले असतील तर रुग्ण व्यक्तीला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहावे लागते. गरज भासल्यास प्लेटलेट्स रुग्णाला देता येतात. रक्तपेढ्यांमध्ये जमा होणा-या रक्तातील प्लेटलेट्स वेगळे करून हॉस्पिटलमध्ये दिल्या जातात.
थोडे नवीन जरा जुने