कठीण प्रसंगात खचून जाण्यापेक्षा पुढे कसे जाता येईल याचा विचार करावा...

खुपदा असं होतं की, कठीण प्रसंग आल्यावर तुम्ही हिंमत हारून बसता; परंतु असे हिंमत हारून बसण्यापेक्षा पुढे कसे जाता येईल, याचा विचार करावा, खूप लोक वेदनेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मग ते शारीरिक असो वा मानसिक, जेव्हा की, पुढे जाण्यासाठी दु : ख सर्वांत आवश्यक आहे. ते तुम्हाला कणखर बनवत आणि पुढे जाण्यास शिकवतं. 


प्रत्येक विचाराचा जन्म डोक्यात होतो, विचारांवर पकड मिळवल्याने लढाई जिंकली जाऊ शकते. असे केल्याने कठीण गोष्टी आपोआप सोप्या होत जातील, समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक विचार केला जाऊ शकेल. अनेकदा आपण अशा गोष्टींविषयी विचार करू लागतो. 

ज्या वास्तवात नसतातच. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमची सर्वात मोठी भीती अस्तित्वातच नाही. कठीण प्रसंगात हिंमत हारण्याची आवश्यकता नाही. याचा अनुभव होणेसुद्धा आवश्यक आहे. कारण तुम्हाला जेवढा अनुभव असेल , तेवढे तुम्ही पुढे जाऊ शकाल. 

म्हणून चांगला वाईट प्रत्येक गोष्टीचा अनुभव असायला हवा. काही गोष्टींची जबाबदारी उचलायला शिका, कारण तुम्ही त्या गोष्टींमध्ये किंवा त्या सर्व परिस्थितीत बदल घडवून आणू शकत नाही. कठीण काळ आला, तर तो लवकर निघूनही जाईल. कारण जे आज आहे ते उद्या नाही.
थोडे नवीन जरा जुने