आरोग्यदायी शरीरासाठी तसेच आकर्षक चेहर्यासाठी ह्या काही खास टिप्स !


महिला डोक्याच्या केसापासून ते पायांच्या नखांपर्यंत अनेक सौंदर्य प्रसाधने वापरतात. सुंदर दिसण्यासाठी त्या काहीही करण्यास तयार होतात; परंतु काही सौंदर्यप्रसाधनांचा फायदा कमी, तर तोटाच जास्त होतो. यामुळे दीर्घकाळ फायदा देणारे सोपे नैसर्गिक उपाय करून दिसा सुंदर.. तुमच्या धावपळीच्या जीवनशैलीमधून नियमित वेळ काढून फक्त २० ते २५ मिनिटे योगासन करा. यामुळे त्वचा चमकदार होऊन शरीरावरील अतिरिक्त चरबीही कमी होते. मग, नक्कीच तुम्ही सुंदर आणि सेक्सी दिसाल.

पोटावरील चरबी -


पोटावरील वाढलेली चरबी अनेकांची गंभीर समस्या बनत चालली आहे. ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही, दोन्ही पायात अंतर ठेवून उभे राहा. गुडघ्यात न वाकता पायाची बोटे हाताच्या बोटांनी पकडण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला ते जमणार नाही; परंतु नियमित केल्याने ते शक्य होईल. असे नियमित १० वेळा केल्यास तुम्हाला चांगले परिणाम दिसतील. जमिनीवर सरळ ताठ झोपा. पाय जवळ करा. आता पाय न वाकवता उठण्याचा प्रयत्न करावा. अशाच प्रकारे कंबरेपासून पाय व डोके, पाठ वर उचलण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत तुमचे शरीर नावेप्रमाणे दिसेल. असे १ मिनिट राहा. तसेच तुम्ही पश्चिमोत्तनासन करूनही चरबी कमी करू शकता.

सुडौल मान 

नाजूक आणि सुंदर मान चेह-याचे सौंदर्य अधिकच वाढवते; परंतु काहींची मान ही अधिकच जाड असते. यामुळे सडपातळ मान करण्यासाठी तुम्ही दोन्ही पाय जवळ करून उभे राहा. चेहरावरच्या बाजूने मान जितकी नेता येईल तितकी न्या. काही काळ अशाच स्थितीत राहून मान हळूहळू खाली आणून हनुवटी छातीला लावण्याचा प्रयत्न करावा. नंतर ताठ उभे राहून खांदे न हलवता डोके दोन्ही बाजूस हलवावे. हे आसन २० वेळा तरी करावे.

सुंदर हास्य दागिना.. मौखिक आरोग्यासाठी हे खाणे टाळा - 

तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या डोळ्यांनंतर तुमचे सौंदर्य अधिकाधिक खुलून दिसण्याकरिता तुमचे हास्य हे प्रमुख वैशिष्टय़ आहे? तुमच्या सौंदर्यात भर घालणा-या या हास्यासाठी आपल्या दातांची काळजी घेणे गरजेचे ठरते. त्यासाठी दातांच्या स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठी काही पदार्थ हे जाणीवपूर्वक टाळायला हवेत.

>> सूर्यफुलाच्या बिया – सूर्यफुलाच्या बिया आपल्या दातासाठी वाईट नाहीत, पण त्यांच्या कडक बाह्य टरफलामुळे हिरडय़ांचे नुकसान होऊ शकते.

>> मिंट – मिंटच्या गोळ्यांमुळे मौखिक दरुगधी टाळता येते. मात्र, दातांच्या आरोग्यासाठी ते अपायकारक आहे. आरोग्यासंबंधी विविध आजार यामुळे होऊ शकतात. पण, तुम्हाला जर मिंटच्या गोळ्या खायच्याच असतील, तर तुम्ही शुगर फ्री मिंट वापरू शकता.

>> सुकामेवा – सुकामेवा हा जीवनसत्त्वे आणि फायबरयुक्त असतो; परंतु त्यातील चिकटपणामुळे ते आपल्या दातावर चिकटून राहते. त्यामुळे मौखिक दुर्गंधीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

>> बर्फाचे तुकडे – बर्फ चावून खाणे, हे आपल्या दातांच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. बर्फ आणि दात हे दोन्हीही क्रिस्टल्सपासून बनलेले असल्याने एकमेकांच्या विरोधात कार्य करतात. त्यामुळे दाताचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

>> सुगंधमिश्रित पाणी – सुगंधमिश्रित पाण्यात सायट्रीक अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दात किडण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

दातांच्या आरोग्यासाठी हे पदार्थ टाळले, तर दात निरोगी राहतील. तसेच तुमचे हास्य अधिक निखळ होऊन तुमच्या सौंदर्यात अजून भर पडेल.

थोडे नवीन जरा जुने