'या' पदार्थाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढवण्याबरोबर ताकदही वाढेल !


पिझ्झा ते सँडविचपर्यंत प्रत्येक आवडत्या पदार्थात आज ऑलिव्हचा समावेश आहे. हे फक्त चवच वाढत नाही तर ते आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिकदेखील आहेत. ऑलिव्ह आणि ऑलिव्ह ऑइलने हळूहळू भारतीय जेवणात खास स्थान निर्माण केले आहे. 

तज्ज्ञांच्या मते, दररोज र्मयादित प्रमाणात ऑलिव्हचे सेवन करणे आरोग्यासाठीही चांगले असते, परंतु याचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. जाणून घेऊया यापासून होणार्‍या फायद्यांविषयी..

स्मरणशक्ती बळकट होते
ऑलिव्हमध्ये पॉलिफेनल्स असतात. हे एक नैसर्गिक रसायन असून मेंदूचा ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतो. मॅसाच्युसेट्स विद्यापीठाद्वारे करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, दररोज ऑलिव्हज खाल्ल्याने स्मरणशक्तीमध्ये 25 टक्क्यांपर्यंत सुधारणा होते.


सुरकुत्या कमी होतात
दररोज र्मयादित प्रमाणात ऑलिव्हचे सेवन केल्याने चेहर्‍यावरील सुरकुत्या 20 टक्क्यांपर्यंत कमी होतात. खरे तर यामध्ये असलेले ऑलिक अँसिड त्वचा मऊ आणि निरोगी ठेवते. याशिवाय ऑलिव्ह व्हिटॅमिन ‘ई’चेसुद्धा चांगले स्रोत आहेत.


ताकद मिळते
एक कप ऑलिव्हमध्ये 4.4 मिलिग्रॅम लोह असते. लोहाच्या मदतीने फॅटचे रूपांतर उर्जेत होते आणि हिमोग्लोबीनही वाढते.


मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अँसिड आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्यामुळे ऑलिव्ह वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात. त्यामुळे हृदयरोगापासून बचाव होतो.


ऑलिव्ह आर्टिरियोस्क्लेरॉसिसपासून बचाव करतात. या आजारामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्या कडक होतात.


त्वचा टोन करण्यासोबतच त्याची सुरक्षाही ऑलिव्ह करतात.
थोडे नवीन जरा जुने