या अभिनेत्रीने व्हर्जिन नसल्याची दिली कबुली
मुंबई : बिंदास्त आणि बोल्ड व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असलेली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे चारच दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकली. त्यानंतर, नेहाचा पती शार्दुल याचा आधी दोन वेळा घटस्फोट झालाच्या चर्चांना जोर आला. 


त्यावर बोलताना, शार्दुलचा दोनदा घटस्फोट आणि त्याला आधीच्या लग्नांपासून दोन मुली आहेत, तर काय झालं? मीही व्हर्जिन नाही, असं सडेतोड उत्तर नेहा पेंडसेने दिलं आहे.

‘आजकाल अनेक कारणांमुळे बऱ्याच जणांचं लग्न उशिरा होतं. करिअरवर लक्ष केंद्रित करणारी आजची पिढी आहे. अनेक जण लग्न होण्याआधी एकापेक्षा जास्त वेळा रिलेशनशीपमध्ये अडकलेले असतात. 

लग्नाप्रमाणेच निष्ठा, प्रेम आणि शारीरिक जवळीक या गोष्टी रिलेशनशीपमध्येही असतात, फक्त कायद्याचा शिक्का बसलेला नसतो, इतकंच’ असं नेहा पेंडसे एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हणाली.
थोडे नवीन जरा जुने