जाणून घ्या ! ई- सिगरेटद्वारे धूम्रपानापासून सुटका मिळू शकते का?इलेक्ट्रॉनिक सिगरेटद्वारे धूम्रपानापासून सुटका मिळू शकते का, यावर आरोग्यतज्ज्ञ चर्चा करत आहेत. इलेक्ट्रॉनिक सिगरेटमध्ये धुराऐवजी निकोटीन निघते. या विषयावर फारसे संशोधन झालेले नाही. 


तरीही एका संशोधनाने धूम्रपानाची सवय सोडवण्याच्या ई-सिगरेटच्या क्षमतेवर प्रश्न केला आहे. सिगारेट पिणार्‍या 949 जणांचा अभ्यास केला गेला. 

यांतील 88 लोक ई-सिगारेटचाही वापर करत होते. लक्षात आले की, ई-सिगरेट पिण्याने त्यांना वर्षभरात सिगारेट सोडण्यास किंवा कमी करण्यास सहायक ठरली नाही.

ई-सिगरेटला सामान्य तंबाखू सिगारेटच्या तुलनेत सुरक्षित समजले जाते. त्यात तंबाखू नसते. ती टार व कार्बन मोनॉक्साइड सोडत नाही. काही लोक म्हणतात, कमी धोकेदायक निकोटीन पिणे योग्य आहे. अलीकडच्या संशोधनात पुढे आले आहे की, ई-सिगरेट पिणार्‍या किशोरवयीनांना तंबाखू सिगारेट पिण्याची शक्यताही वाढते.

 ई-सिगरेट तंबाखू सोडण्यात लाभदायक असल्याचे स्पष्ट झाले नाही. खरे म्हणजे अडचण ही आहे की, ई सिगारेटचे प्रचलन इतक्या दीर्घ काळासाठी झाले नाही की, त्याच्या फायदे व हानीच्या बाबतीत पुरेसे पुरावे मिळू शकतील. अनेक वर्षांनंतर तपास लागेल की, हे उत्पादन धूम्रपानाची सवय बंद करेल. नव्या पद्धतीने लोक स्वत:ला हानी तर पोहोचवत नाहीत.
थोडे नवीन जरा जुने