मोबाइल उशाशी ठेवून झोपण्याची सवय असेल तर वेळीच व्हा सावध,नाहीतर....


मोबाइल उशाशी ठेवून झोपण्याची तुम्हाला सवय असेल तर वेळीच 'जागे' व्हा. मोबाइलच्या अशा वापरामुळे वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळू शकतं.


मोबाइल फोन उशाशी ठेवून कधीही झोपू नका, असा सल्ला हंगेरीच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. असे केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 


बर्याच लोकांना मोबाइल उशाशी ठेवून झोपण्याची सवय असते. रात्री अंधारात चॅटिंग करताना किंवा इंटरनेट वापरताना मोबाइलच्या प्रकाशाचा डोळ्यांना त्रास होतो. 


असे केल्यास मोबाइलमधून निघणाच्या रेडिएशनमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात व डोकेदुखी, डोक्यात कंपन, झोप न येणे, थकवा येणे, डिप्रेशन, कानात दुखणे, बहिरेपण इ. समस्या उद्भवतात. यापैकी काही आजार तर दीर्घकाळ परिणाम करणारे असतात.
थोडे नवीन जरा जुने