अशा प्रकारच्या मसाल्यांचा आहारात समावेश केल्याने,जीवनभर निरोगी रहाल !


केवळ चवच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही मसाले अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. जाणून घेऊया कोणता मसाला कसा फायदेशीर आहे.

हिंग : जेवणात हिंग वापरणे पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहे. यामुळे पोटात गॅस तयार होत नाही आणि अपचनही होत नाही.

दालचिनी : याचा वापर केल्याने भाजीला चव येते. हा पदार्थ उष्ण असल्याने ब्लड शुगर आणि कॉलेस्ट्रॉल नियंत्रित करणे तथा पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते.

विलायची : खाद्यपदार्थांचा गंध वाढवण्यात विलायची महत्त्वाची भूमिका बजावते. तोंडाची दुर्गंधी दूर करणे, भूक वाढवणे, तणाव आणि मळमळणे यासारख्या समस्याही दूर होऊ शकतात.

लवंग : चवीला तिखट असते. याची अँटिबॅक्टेरियल आणि अँटिसेप्टिक प्रॉपर्टी दातदुखीसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

मेथी : चवीला कडू असली तरी मेथी रक्त शुद्धीकरणाचे काम करते. यामुळे त्वचेशी संबंधित आजार आणि मलावरोधातून सुटका होते. तसेच यामुळे मेटाबॉलिक रेटही तीव्र होतो.

हळद : याची अँटिसेप्टिक प्रॉपर्टी कोणतीही जखम किंवा घाव लवकर भरण्यास साहाय्यक आहे. तसेच उटण्यात हळदीचा वापर केल्यास त्वचेचा रंगही उजळतो.

लाल मिरची : मिरचीमुळे भाजीला चव येतेच, पण एलडीएल म्हणजेच वाईट कॉलेस्टेरॉलची पातळीही कमी होते.
थोडे नवीन जरा जुने