तुम्हीही च्युइंगम खात असाल तर,वेळीच सावध व्हा कारण....

अनेक लोकांना च्युइंग गम चघळण्याची सवय असते. पाहावे तेव्हा त्यांच्या तोंडात च्युइंग गमचे रवंथ सुरू असते. तुम्हालाही अशी सवय असेल तर वेळीच सावध व्हा. 


कारण च्युइंग गमसारखे खाद्यपदार्थांमध्ये सामान्य रुपात वापरल्या जाणाऱ्या एक ॲडिटिव्हमुळे आतड्यांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते, असा इशारा एका ताज्या अध्ययनातून देण्यात आला आहे. 

ऑस्ट्रेलियातील सिडनी युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यांच्या माहितीनुसार, ई-१७१ (टाइटेनियम डायॉक्साइड नॅनोपार्टिकल्स) नावाच्या या फूट ॲडिटिव्हच्या आरोग्यावर पडणाऱ्या प्रभावाबाबत विचार करण्यात आला.

खाद्यपदार्थ आणि काही औषधांमध्ये हाइटनिंग एजंटच्या रुपात या फूड ॲडिटिव्हचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. च्युइंग गम आणि म्योनिजसह ९००हून जास्त खाद्यपदार्थांमध्ये ई-१७१ आढळून आले आहे. 

गेल्या एक दशकापासून टाइटेनियम डायॉक्साइडचे सेवन जगभरात वाढले आहे. त्याचा संबंध काही आारोग्य समस्यांसोबत दिसून आला आहे. 

उंदरावर करण्यात आलेल्या या अध्ययनात ई-१७१चा वापर केलेल्या खाद्यपदार्थांचा गट म्हणजे आतड्याच्या बॅक्टेरियावर प्रभाव आढळून आला आहे.
थोडे नवीन जरा जुने