मधुमेहग्रस्त स्त्रियांनी 'ही' दक्षता घेतलीच पाहिजे !आपल्याला मधुमेह असेल तर आपण बाहेरचे खाणे किंवा पार्टीला जाणे बंद करावे, असा याचा अर्थ नाही. कधी-कधी आपल्या नियमित डाएटशिवाय आपण काही खाऊ शकता. 


जर मधुमेह गंभीर अवस्थेत नसेल आणि डॉक्टरांनी आपल्याला बाहेरचे खाणे पूर्णपणे बंद करण्याचा सल्ला दिला नसेल तर काळजीचे कारण नाही.

मधुमेह असतानाही थोड्या प्रमाणात घेतलेली साखर पचवण्याची क्षमता शरीरात असते. पुढल्या वेळी पार्टीला जाताना या गोष्टी लक्षात ठेवा-

उपाशीपोटी जाऊ नका - 

घरून कधीही उपाशीपोटी जाऊ नका. भाजलेले हरबरे, धिरडे, अंडे, अक्रोड, बदाम वगैरे खाऊन जाणे चांगले. रात्री पार्टीला जायचे असेल तर सायंकाळी चहासोबत नाष्टा करून जावे.

खाण्याची वेळ पाळा - 

रात्रीचे जेवण आठ वाजेपूर्वीच करणे केव्हाही चांगले. रात्रीचे जेवण उशिरा होईल, असे वाटत असेल तर घरूनच काही प्रमाणात कार्बोहायड्रेट्स खाऊन जा. रेस्टॉरंटमध्ये सूप, सॅलड किंवा प्रोटीनयुक्त पदार्थांना प्राधान्य द्या.

जेवणाचा प्लॅन बनवा - 

सूप किंवा सॅलडने जेवणास आरंभ करा. सूप वा सॅलड व्हेज किंवा चिकनचे असावे, नूडल सूप किंवा पास्ता सॅलड नसावे याकडे लक्ष द्या. एकटे वाटू नये म्हणून गोड पदार्थांऐवजी चहा, कॉफी, ग्रीन टी किंवा डार्क चॉकलेट घेता येईल.

आरोग्यवर्धक आहार घ्या - 

मल्टिक्विझिन रेस्टॉरंट निवडा. तेथे आपल्याला आहाराचे अनेक पर्याय मिळतील. भारतीय पदार्थ चांगले असतात. थाई व चायनीज रेस्टॉरंटमध्येही जाता येईल. मात्र, नूडल्स व फ्राइड राइस न खाणेच चांगले.

पेय टाळा - 

कॉकटेल वा मॉकटेलला नकार द्या. ड्रिंक्समध्ये कॅलरी घेण्याऐवजी जेवणातून घेतल्यास उत्तम. गोड फळांचा रस आपल्यासाठी पूर्णपणे निषिद्ध आहे.
थोडे नवीन जरा जुने