अहंकारामुळे अनेक दोष निर्माण होतात,त्यामुळे तुम्ही स्वतःचाच नाश करता !अहंता म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजे मीपणा, सर्वप्रथम माणसाला स्वतःचा अहंकार लक्षातच येत नाही. 


एखाद्याने लक्षात आणून दिला तरी तो अहंकार न वाटता स्वाभिमान वाटतो आणि त्या गैरसमजातच माणूस स्वतःच्या अहंकाराला स्वाभिमान म्हणून कुरवाळीत बसतो.अहंकारामुळे माणूस स्वतःही दुःखी होतो व इतरांनाही दुःखी करतो. अहंकारामुळे अनेक दोष निर्माण होतात व माणूस अहंकारी वृत्तीनेच आपल्या या दोषांचेही समर्थन करतो. 

अहंकार सर्वात वरच्या दर्जाचा दुर्गुण म्हणून सांगितला जातो म्हणजे, आयुष्यात ज्या काही गोष्टी आवर्जून टाळल्या पाहिजेत किंवा सोडून दिल्या —पाहिजेत त्यात अहंकार महत्त्वाचा; कारण अहंकारी माणूस हा लोकांपासून दूर जात असतो. त्याला सोबत मिळत नाही, सवलत मिळू शकत नाही आणि एकटेपणामुळे याला दिवसेंदिवस त्रास वाढत राहतो. 

अहंकारामुळे तो नेहमीच चांगल्या संगतीला मुकतो. त्याला वास्तवाचं भान राहात नाही. सोबत असलेल्या लोकांची किंमत राहात नाही. जी गोष्ट प्रेमाने मिळवता येते, तिथेही तो अहंकार दाखवून हातच्या गोष्टी घालवून बसतो म्हणून, अहंकार नेहमीच टाळला पाहिजे. 

गंमत म्हणजे, जो माणूस असा अहंकारी असतो, तो त्याचा अहंकार त्याच्या चांगल्या काळातच दाखवत असतो. त्याचे दिवस चांगले असतात तेव्हा, त्याच्याकडे भरपूर पैसा असतो तेव्हा, त्याच्याकडे पत प्रतिष्ठा असते तेव्हा. 

थोडक्यात म्हणजे, सगळं चांगलं चाललेलं असतं, तेव्हा तो अहंकार दाखवतो; पण त्या अहंकाराचा परिणाम किंवा अहंकारामुळे होणारं नुकसान मात्र त्याच माणसाला नेहमी वाईट काळातच दिसत असतं.
थोडे नवीन जरा जुने