आहारात 'या' पदार्थांचा समावेश केल्याने संधिवातापासून मिळेल मुक्तता !


भोजन पद्धतीत बदल करून आर्थरायटिसचे (संधिवात) रुग्ण आपला त्रास कमी करू शकतात. तज्ज्ञांच्या मते, खाद्यपदार्थांमुळे संधिवात मुळापासून नष्ट केला जाऊ शकत नाही; परंतु स्थितीत बऱ्यापैकी सुधारणा आणली जाऊ शकते. या खाद्यपदार्थांबाबत अधिक जाणून घेऊया.


 ऑलिव्ह ऑइल

एक्स्ट्रा-व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेला ओलिओकेंथेल नावाचा घटक सूज येण्यासाठी जबाबदार असलेल्या एंझाइम्सला ब्लॉक करण्यास सहायक ठरतो. फिलाडेल्फिया येथील मोनेले केमिकल सेन्सेज सेंटरच्या एका संशोधनानुसार, जेवणात तीन चमचे ऑलिव्ह ऑइलचा वापर ब्रुफेमच्या एक दशांश भागाच्या समान काम करते. तज्ज्ञांच्या मते, ऑलिव्ह ऑइल कॅलरी फ्री (एका चमच्यात ११९ कॅलरी असते) नसते, परंतु मर्यादित प्रमाणात याचे सेवन केले जाऊ शकते. एक चमचा ऑलिव्ह ऑइल सलाड किंवा भाजीमध्ये वापरणे फायदेशीर आहे.

कांदा :

कांद्यात असलेल्या क्युर्सेटिन नावाच्या अँटिऑक्सिडंटमुळे सूज वाढवणाऱ्या रसायनाची सक्रियता बाधित होते. हेच काम अॅस्प्रिन आणि ब्रुफेन यांसारखी औषधेही करतात. तज्ज्ञांच्या मते, कांद्याच्या सेवनाने संधिवाताच्या रुग्णांना दिलासा मिळतो. याउलट जे लोक तोंडातून दुर्गंधी येण्याच्या भीतीने कांद्याचे सेवन करत नाहीत, त्यांनी टोमॅटो किंवा सफरचंदाचे सेवन केले पाहिजे. सलाडच्या रूपात कांद्याचे सेवन करता येईल किंवा भाजी बनवताना त्यात कांदा टाकावा.

मासे :

माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर आढळते. हे अॅसिड सूज वाढवणाऱ्या रसायनांना बाधित करते. तसेच माशांमध्ये असलेल्या 'ड' जीवनसत्त्वामुळेसुद्धा सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. जेवणात एक ग्रॅम ओमेगा-३ आवश्यक आहे. तसेच २.२७ ग्रॅम अक्रोडचे सेवनही करता येईल.

 'क' जीवनसत्त्व :

सिमला मिरची आणि सर्व प्रकारच्या आंबट फळांमध्ये भरपूर असलेले 'क' जीवनसत्त्व कोलेजनला सुरक्षित ठेवण्यास मदत करते. तज्ज्ञांच्या मते, जेवणात या जीवनसत्त्वाचा अभाव असल्यास संधिवात पीडिताचा त्रास आणखी वाढू शकतो. कॅनडा येथे संधिवात असलेल्या १३१७ पुरुषांवर एक संशोधन करण्यात आले. त्यामध्ये जे लोक जेवणात १५०० मिलीग्रॅम 'क' जीवनसत्त्व दररोज समाविष्ट करतात त्यांचा त्रास ४५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो, असे आढळून आले. तसेच जे लोक पुरेसे 'क' जीवनसत्त्व घेत नाहीत त्यांना जास्त त्रासाचा सामना करावा लागतो. २००-५०० मिलीग्रॅम 'क' जीवनसत्त्वाने सुरुवात करा. एक संत्रा व एक कप स्ट्रॉबेरीचे सेवन करा.
थोडे नवीन जरा जुने