हे तुम्हाला माहित आहे का ? उच्च रक्तदाबाचे रुग्णही करू शकतात रक्तदान पण..उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना रक्तदान करता येत नाही व अशा लोकांचे रक्त इतर कुणालाही देऊ नये, असा सर्वसाधारणपणे समजले जाते. उच्च रक्तदाबाचे रुग्ण रक्तदान करतात. फक्त रक्त देतेवेळी त्यांचा रक्तदाब १८० सिस्टोलिकपेक्षा कमी आणि १०० डायस्टोलिकपर्यंत असणे गरजेचे आहे.

म्हणजेच रक्तदानाच्या वेळी त्यांच्या रक्ताचे तापमान आणि त्यावरील दाब सर्वसामान्य असावा. अमेरिकेतील रेडक्रॉस सोसायटीच्या माहितीनुसार, आपण रक्तदाब नियंत्रित करणारे औषध घेत असाल आणि त्यांचे दुष्परिणाम रक्तावर होत नसतील तेव्हा रक्तदान करता येते. म्हणजेच रक्तदाबाच्या गोळ्यांचा रक्तदानाशी थेट संबंध येत नाही.

 पण उच्च रक्तदाबाची औषधे नियमितपणे न घेणाऱ्या रुग्णांच्या रक्तात या आजाराचे दुष्परिणाम दिसून येतात. या आजाराची अनेक लक्षणे त्यांना सतत जाणवत असतात. त्यांनी कधीही रक्तदान करू नये. रक्तदानापूर्वी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे, तसेच स्वच्छ-ताजे अन्न खावे व भरपूर पाणी प्यावे. लोहयुक्त आहार असल्यास उत्तम. जड वस्तू उचलणे आणि व्यायाम करणे टाळा. रक्तदानापूर्वी भरपूर रसयुक्त फळे खाल्ल्याने आणखी ऊर्जा मिळेल. .
थोडे नवीन जरा जुने