तुम्हीही सतत एसीमध्ये बसत असाल तर वेळीच व्हा सावध !


सांधेदुखी :
एसीमधून निघणाऱ्या हवेमुळे सांधेदुखीचे आजार सतावतात.

अ‍ॅलर्जीची समस्या - 
सतत एसीमध्ये बसून राहिल्याने तुम्हाला अ‍ॅलर्जी, सर्दी-खोकल्यासारखे आजारही होऊ शकातत. याचे मुख्य कारण म्हणजे एसीमधील फ्लिटर बऱाच काळ साफ केले जात नाही. त्यामुळे त्यातून निघणाऱ्या बॅक्टेरिया आणि धुळीमुळे अ‍ॅलर्जी होण्याचा धोका असतो.

थकवा - 
एसीचे तापमान खूपच कमी असते. ज्यामुळे शरीराला तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यामुळे शरीरात थकवा निर्माण होतो.

त्वचा कोरडी होणे - 
सतत एसीमध्ये बसून राहिल्याने त्वचा कोरडी पडते. एसीमध्ये नॅचरल हवा बाहेर निघत नाही त्यामुळे त्वचा कोरडी होते.

सायनस - 
एका संशोधनादरम्यान असे समोर आलेय की, जे लोक सतत 4-5 तास एसीमध्ये बसून असतात त्यांना सायनसची समस्या जाणवते.
थोडे नवीन जरा जुने