व्यायामावर होतो का अर्धवट झोपेचा परिणाम?


तुम्हालाही जर हीच समस्या भेडसावत असेल, तर पुरेशी झोप न होणे हे यामागील सर्वांत मोठे कारण असू शकते. तज्ज्ञांच्या मते, जे लोक पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत, ज्यांची झोप वारंवार मोडते किंवा जे लोक अनिद्रेने ग्रस्त आहेत, अशा लोकांच्या नियमित व्यायामावर वाईट परिणाम जाणवतो. कसा ते जाणून घेऊया.

रिकव्हरीची संधी मिळत नाही - 
मुंबई येथील फिटनेस कन्सल्टंट शहजाद डावर म्हणतात की, व्यायाम करताना शरीराला भरपूर ऊज्रेची गरज भासते. याउलट जर पुरेशी झोप होत नसेल तर दुसर्‍या दिवशी व्यक्तीला थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे स्वाभाविक आहे. अशा स्थितीत स्नायू कमी ऊज्रेतही अधिक मेहनत करतात. यामुळे व्यायामानंतर शारीरिक क्षमता कमकुवत होते.

ऊर्जा कमी होईल - 
मुंबई येथील फिजिशियन धवनिका कापडिया म्हणतात की, स्नायूंमध्ये कमजोरी आल्याने व्यक्ती जास्त जोर लावू शकत नाही. अशा स्थितीतही एखादा व्यक्ती व्यायाम करीत असेल, तर त्याला योग्य लाभ मिळत नाही. त्यामुळे सात ते आठ तासांची झोप नियमानुसार घ्यायलाच पाहिजे.

चरबीवर नियंत्रण राहत नाही - 
शहजाद म्हणतात की, पुरेशी झोप न झाल्याने शरीरात स्ट्रेस हार्मोन कार्टिसॉलची सक्रियता वाढते. अशावेळी स्नायू आणि हाडांवर नकारात्मक परिणाम जाणवतो. विशेषत: जे लोक वजन नियंत्रित करण्यासाठी ‘वेट ट्रेनिंग’ घेतात आणि प्रोटिन सप्लिमेंट्सचे सेवन करतात, त्यांना योग्य लाभ मिळत नाही.

वजन वाढण्याची शक्यता - 
शरीरात स्ट्रेस हार्मोन कार्टिसॉलची पातळी वाढल्याने रक्तात साखरेचे प्रमाण वाढू लागते. याच कारणामुळे जेवणातही अनियमितता येते आणि यामुळे ओव्हरइटिंगचा धोका वाढतो. शहजाद म्हणतात की, अशा स्थितीत व्यक्ती जंक फूड, चरबी असलेले खाद्य पदार्थ आणि स्नॅक्स खाण्यासाठी प्रेरित होतो. यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते. पुरेशी झोप न झाल्यामुळेही तणावाची स्थिती निर्माण होते.

मेटाबॉलिझम होईल मंद - 
धवनिका कापडिया म्हणतात की, पुरेशी झोप न झाल्याने मेटाबॉलिझमवरही विपरीत परिणाम होतो. यामुळे पाचन क्रियेशी संबंधित समस्या निर्माण होतात आणि वजन वाढू लागते. तसेच जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असाल, तर तुम्हाला सहज यश मिळणार नाही.

पोषक द्रव्य शोषून घेत नाही - 
तज्ज्ञांच्या मते, झोपेत शरीरातील ग्रोथ हार्मोन किंवा पेप्टाइड नावाचे हार्मोन सक्रिय असतात. याउलट पुरेशी झोप न झाल्याने हे हार्मोन सक्रिय राहत नाहीत किंवा या हार्मोन्सच्या कार्यप्रणालीत अडथळा येतो. परिणामी शरीर जेवणातील पोषक द्रव्य शोषून घेत नाही. अशा वेळी व्यक्तीने जेवणात कितीही पोषक द्रव्यांचा समावेश केला तरी त्याला कोणताच फायदा मिळत नाही.

झोपण्यापूर्वी व्यायाम करू नये - 
रात्री उशिरा व्यायाम केल्याने झोपेशी संबंधित समस्या निर्माण होतात, कारण यामुळे शरीराचे तापमान वाढते. तज्ज्ञांच्या मते, चांगली झोप येण्यासाठी शरीराचे तापमान कमी असणे गरजेचे आहे. त्यामुळे जे लोक वेळेअभावी रात्री व्यायाम करतात, त्यांनी झोपण्याच्या तीन ते चार तासांपूर्वी व्यायाम करावा.
थोडे नवीन जरा जुने