सासरच्या मंडळींकडून पैशासाठी छळ, महिलेने दीड वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन स्वतःला संपवलं !


बदनापूर : सासरच्या मंडळींकडून पैशासाठी सातत्याने होत असलेल्या छळास कंटाळून विवाहितेने दीड वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील आन्वी येथे घडली. 

स्वाती नानासाहेब ढाकणे, निखिल नानासाहेब ढाकणे अशी मृतांची नावे आहेत. देऊळगावराजा तालुक्यातील असोला जहागीर येथील स्वाती ढाकणे हिचा आन्वीच्या नानासाहेब ढाकणे यांच्याशी विवाह झाला होता.

 लग्नानंतर त्यांना मुलं झाली. मुलं रोगट आहे त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी माहेरहून पैसे आण असे म्हणत नवरा व सासरची मंडळी त्रास देत असल्याने ३० डिसेंबर रोजी रात्री आपल्या दीड वर्षाच्या मुलासह स्वातीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. 

याबाबत तक्रार शिवाजी दगडू मांटे यांनी दिली. जोपर्यंत स्वातीच्या सासरच्या मंडळींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतला. 

नानासाहेब ढाकणे, अंकुश ढाकणे, अंजना ढाकणे, योगेश ढाकणे, अनिता कायंदे यांच्याविरुद्ध चंदनझिरा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
थोडे नवीन जरा जुने