आयुष्य घडवण्यासाठी आजपासूनच स्वीकारा ह्या गोष्टी...


खोट बोलून जोडीदाराला खूश करण्याची कला तुमच्याकड नसेल तर सिंगल राहा.

स्वतःचा आदर ठेवा. नकार दिलेल्या व्यक्तीच्या मागे पळत बसू नका. सगळ्यात शक्तिशाली प्रेरणा नकारातून मिळत असते.

कुणाच्याही आकंठ प्रेमात पडण्यापूर्वी उद्या ती व्यक्ती तुमच्याबरोबर नसेल, तर काय? यासाठीची मानसिक तयारी करून ठेवा.

सतत फोन चेक करू नका. तुमच्या आईवडिलांखेरीज तुमची कुणालाही फारशी काळजी नसते.

काही घडले किंवा घडले नाही, तर लगेच सोशल मीडियावर पोस्ट करू नका. कारण आपले जगणे खासगी ठेवण्यातूनच खरा आनंद मिळतो.

दर वीकेंडला पार्टी करून स्वतःचा पैसा वाया घालवू नका.

तुमच्या योजना कुणालाही सांगू नका. त्याऐवजी प्रत्यक्ष रिझल्ट दाखवा.

चारित्र्य स्वच्छ ठेवा. तुमच्या व्यक्तिमत्त्वातून चमक दिसू द्या आणि तुमच्याभोवती चांगल्या लहरी प्रकटू द्या.

मन निरोगी ठेवायला शिका. मनाच्या पिंजऱ्यातून बाहेर पडणे सगळ्यात अवघड काम असते.

असे ध्येय ठेवा की, सकाळी जाग आल्यावर बेडवरून टुणकन उडी मारून बाहेर पडण्याची इच्छा व्हावी.

इतके चांगले वागा की, ते तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत .

सगळे पुरुष सारखेच नसतात, हे तुमच्या वागण्यातून आणि व्यक्तिमत्त्वातून दाखवून द्या.

कठीण परिस्थितीत कधीही थोडासा विनोद, खोडकरपणा दिसला, तर त्याचा आनंद घ्या. 

तिथूनच परिस्थितीवर मात करण्याची हिंमत मिळत असते. जे रोपांना खतपाणी घालणार नाहीत, त्यांच्या दारात जाऊन वृक्षारोपण करू नका

तुमच्या शरीराला पोषक तत्त्वे पुरवणारे अन्न खा. 

तुमचे हृदय धडकत राहिले पाहिजे, मेंदू तल्लख राहिला पाहिजे आणि स्नायू सक्रिय राहिले पाहिजेत, असे पोषक अन्न खा.

प्रोफाईलवरील तुमच्या माहितीपेक्षा तुमचे व्यक्तिमत्व अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करा.

जा आणि अनोळखी व्यक्तीची ओळख करून घ्या. ती अनोळखी व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः
थोडे नवीन जरा जुने