दिवसभर ताण-तणावापासून सुटका मिळवण्यासाठी, सकाळच्या चहात करा 'हा' बदल.


सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय हवे असते? तुम्हीच नव्हे तर देशातील 83 टक्के कुटुंबांनाही याचीच गरज असते... एक कप चहा...! तुमचा दिवस कसा जाईल, हे सकाळचा चहा ठरवतो. यामुळेच एका फक्कड चहा मिळाला तर तुमचा दिवस मजेत जातो.

गेल्या काही वर्षांत झालेल्या वैज्ञानिक शोध आणि संशोधनांत असले आढळून आले आहे की, चहा पिल्यामुळे लाभणा-या मानसिक शांतीचे कारण आहे त्यात असलेले एल थिआनिन हे तत्व. याचमुळे इतर पेयांपासून चहा हा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. 

आरोग्यदायी घटक : 

एसेन्शिअल ऑइल - 
चहाचा खास फ्लेअर असून अ‍ॅरोमा यामुळेच येतो. पॉलिफेनाल्स - या खास अँटी ऑक्सिडंटमुळे चहा आरोग्यासाठी लाभदायक ठरतो. शरीराला संक्रमणांपासून लांब ठेवते. फायटोन्यूट्रियंट्स - कमी प्रमाणात असलेले व्हिटामिन्स, मिनरल्स व अमिनो अ‍ॅसिड्स आहे. यात एलथियामिनचा समावेश असतो.

लठ्ठपणा घटवतो चहा - 
व्यायाम करूनही वजन कमी होत नसल्याची अनेकजण तक्रार करतात. मात्र ग्रीन टी पिल्यानंतर चयापचय क्रियेचा वेग वाढतो. यामुळे अनेक 70 ते 80 कॅलरी जाळल्या जातात. गरमागरम चहाचे घोट घेता घेता वजन घटवले जाऊ शकते... आहे का नाही झक्कास आयडिया.


कॅलरी फ्री आहे चहा - 
हर्बल टी हा वजन घटवण्यासाठी उपयोगी असल्याचे मानले जाते. काळ्या चहातही अशीच गुणवैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे यात कॅलरीज नसतात, यामुळे वजनही वाढत नाही.


हाडे आणि दात मजबूत चहातील फ्लेवनाइड्स तत्वामुळे शरीरातील हाडांची मजबूत वाढते. चहामध्ये असलेल्या फ्लोराइड्स तत्त्वामुळे दातांत प्लाक चिटकून बसण्यास प्रतिबंध होतो. अनेक संशोधनांत आढळून आले आहे की, 10 वर्षांपासून चहा पित असलेल्या लोकांच्या हाडांत इतरांच्या तुलनेत अधिक खनिजे आढळून आली आहेत.


रोगप्रतिकारक क्षमता - 
चहाच्या सेवनामुळे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेला संक्रमणांपासून लढण्यास मदत मिळते. रोज चहा पिल्याने तुम्ही गंभीर आजारांच्या धोक्यापासून वाचू शकतात. चहातील वृद्धत्व प्रतिरोधक क्षमतेमुळे तुमचे तारुण्य कायम राखण्यास सहाय्य होतो. सोबतच वाढत्या वयामुळे शरीराला होणा-या हानीपासूनही चहा वाचवतो.


कॅफिनचे कमी प्रमाण - 
कॉफीच्या तुलनेत चहात कॅफिनचे प्रमाण ब-यापैकी कमी असते. यामुळे चहा सेवनामुळे धोका संभवत नाही.
थोडे नवीन जरा जुने