जर तुम्हीही 'ह्या' लक्षणांनी पिडीत असाल तर ते तुमच्यासाठी घातक ठरू शकत!


साधारण दिसणारी आरोग्याशी संबंधित छोटी-छोटी लक्षणे अनेकदा आरोग्य समस्यांची सुरुवातीची अवस्था असू शकतात. बहुतांश लोक याबाबत गंभीर राहत नाहीत त्यामुळे अनेक वेळा उपचार करण्यात उशीर झालेला असतो. जाणून घेऊया तुम्हाला मदत करू शकणा-या आणि वेळेत तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकाल अशा लक्षणांच्या बाबतीत... 

पायातील फोड 
जर पायाच्या अंगठ्यात किंवा बोटांच्या मध्ये फोड दिसून आला तर ती गंभीर बाब आहे. कारण बॅक्टेरिया फोडास नुकसान पोहोचवू शकतात. अशा वेळी पीडिताचा त्रास आणखी वाढेल. खेळाडूला ही समस्या होण्याची जास्त शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते, जे लोक पायात दिवसभर बूट घालून असतात त्या लोकांनी काही वेळासाठी मीठ टाकलेल्या कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवावेत. यामुळे फंगल इन्फेक्शनसाठी जबाबदार असलेल्या बॅक्टेरिया नष्ट होतील. साधारणत: पुरुषांना अशा समस्यांचा अधिक सामना करावा लागतो. 

पाय दुखणे 
हा हार्ट अ‍ॅटॅक (हृदयविकाराचा झटका) चा संकेत असू शकतो. साधारणत: छातीत दुखणे हा हार्ट अ‍ॅटॅकचा पहिला संकेत असल्याचा भ्रम आहे, परंतु हे चुकीचे आहे. खरे म्हणजे रक्तप्रवाह बाधित झाल्यावर अनेक वेळा पायांपासूनही वेदना सुरू होतात. पायांची रक्तवाहिनी प्लाकमुळे ब्लॉक होते. त्यामुळे स्नायूपर्यंत आॅक्सिजन पोहोचत नाही आणि वेदना व्हायला लागतात. त्यासाठी कमरेच्या खालच्या भागातील पोट-या किंवा पायातील वेदनांकडे कानाडोळा करू नये. विज्ञानाच्या भाषेत याला पेरीफेरल आर्टियल डिसिज (पीएडी) असे म्हणतात. आर्टियल ब्लॉकेजमुळे होणा-या पायातील वेदना व्यायाम करताना आणखीनच त्रासदायक ठरतात. कारण शरीराला आणखी ऑक्सिजनची गरज भासते. 

गळ्याशी संबंधित आजार 
जर अन्न गिळण्यासाठी तुम्हाला त्रास होत असेल तर ही गळ्याशी संबंधित समस्या आहे. ‘जर्नल आॅफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन’च्या संशोधनानुसार, 40 टक्के लोक अशा वेळी अँटिबायोटिक घेतात. मात्र, यासाठी बॅक्टेरिया जबाबदार असतात. आहारनलिका/श्वासनलिकेच्या वरच्या भागातील सूज, संसर्ग किंवा टॉन्सिल्समुळे असे होऊ शकते. दोन ते तीन दिवसांपर्यंत हा त्रास कायम राहिल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. जर संसर्ग टॉन्सिल्सच्या आत, लिंफ नोड्स आणि आसपास टिश्यूजपर्यंत पोहोचला तर तेथे मळही तयार होऊ शकतो आणि श्वासनलिका बाधितही होऊ शकते. 

गुडघे दुखणे 
गुडघ्याशी संबंधित कोणत्याही प्रकारचा त्रास जसे गुडघेदुखी, कंपण किंवा आकस असल्यास त्याकडे कदापि कानाडोळा करू नये. तज्ज्ञांच्या मते, जर गुडघेदुखी दोन तासांच्या आत थांबत नसेल तर हा आॅस्टियो अर्थरायटिसचा संकेत असू शकतो. गुडघा शरीराचा महत्त्वाचा सांधा आहे. कारण गुडघ्यावर संपूर्ण शरीराचा भार असतो. तुम्ही व्यायाम करत आहात तर काही दिवसांसाठी तो बंद करावा. यादरम्यान गुडघेदुखी कमी होत आहे किंवा नाही हे तपासून पाहावे. जर हे लक्षण तीन महिन्यांपर्यंत कायम राहत असेल तर वेळ वाया न घालवता तातडीने डॉक्टरांकडून तपासून घ्यावे. 

अ‍ॅक्युपंक्चर फायदेशीर 
जर पीडित अ‍ॅक्युपंक्चरची मदत घेत असेल तर 40 टक्क्यांपर्यंत अर्थरायटिसच्या वेदनेतून सुटका होऊ शकते. अ‍ॅक्युपंक्चरमुळे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम जाणवत नाहीत.

वजन कमी करावे 
चरबी असलेल्या व्यक्तीने जर पाच किलो वजन कमी केले तर त्याला अर्थरायटिस होण्याचा धोका अर्ध्याने कमी होतो. यास ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ’च्या एका संशोधनातून दुजोरा मिळाला आहे.
थोडे नवीन जरा जुने