गुळाचा छोटासा तुकडा खाल्ल्यास काय होईल? जाणून घ्या !


गुळाच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते. शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात आणि शरीरातील तापमान नियमित ठेवण्यासाठी गुळ लाभदायक आहे. जेवण झाल्यानंतर गुळ खाल्यास पोटात गॅस होत नाही.

गुळामध्ये सुक्रोज 59.7 टक्के, ग्लुकोज 21.8 टक्के, खनिज 26 टक्के तसेच पाण्याचा अंश 8.86 टक्के असतो. याशिवाय गुळामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह आणि ताम्र तत्व भरपूर प्रमाणात असतात. यामुळे गुळाचे सेवन  अवश्य करावे.


गुळ आणि काळ्या तिळाचे लाडू खाल्यास सर्दीमध्ये दम्याचा त्रास होत नाही. दररोज गुळाचे सेवन केल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो. ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे, त्यांनी दररोज गुळाचे सेवन अवश्य करावे. गुळामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.


गुळ सेलेनियमसोबत अँटीऑक्सीडेंट स्वरुपात कार्य करतो. गुळामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, जस्त हे घटक असल्यामुळे दररोज याचे सेवन करणाऱ्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गुळामध्ये मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात आढळते यामुळे बॉडी रिचार्ज होते आणि थकवा दूर होतो.


जर तुम्हाला गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास असेल तर जेवण झाल्यानंतर थोडासा गुळ अवश्य खा. यामुळे तुमच्या दोन्ही समस्या दूर होतील.

अनेक लोकांना कान दुखीचा त्रास सुरु होतो. अशावेळी कानामध्ये मोहरीच्या तेलाचे दोन थेंब टाकावेत तसेच गुळ आणि शुद्धतुपाचे एकत्रित सेवन करावे.
थोडे नवीन जरा जुने