जाणून घ्या... वयोगटानुसार व्यायामात कोणते बदल केले पाहिजे.


निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा आहे, हे आपण जाणतोच. मात्र, वयानुसार कोणता व्यायाम केला पाहिजे, याची माहिती कोणालाच नसते. तज्ज्ञांच्या मते, वयानुसार होणारा शरीराचा विकास आणि हार्मोनल बदलानुसार व्यायामात बदल गरजेचा आहे. असे न केल्यास व्यायामाचा फायदा होत नाही. 

2 ते 5 वर्षे : या वयात मुलांचा विकास तीव्र गतीने होतो. याच काळात मुले आपल्या शरीराचा तोल सांभाळण्यास शिकतात. मेरीलँड विद्यापीठाच्या कायनेसिओलॉजी विभागाच्या एका संशोधनानुसार, गुडघ्यावर चालणारी मुले शारीरिक हालचालीदरम्यान आपल्या स्नायूंच्या समूहाचा सर्वाधिक उपयोग करतात. 

व्यायाम : तज्ज्ञांच्या मते लहान मुलांना स्वाभाविकरीत्या धावणे, उड्या मारणे किंवा कुठेही चढण्याचा प्रयत्न करणे या सवयी असतात. अशावेळी मुलांना सक्रिय ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कारण तोच त्यांचा व्यायाम असतो. आई-वडिलांनी मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. 

5 ते 8 वर्षे : या वयोगटातील मुलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात आणि शरीराचा वेगाने विकास होतो. किशोरावस्थेपर्यंत मुलांची उंची दरवर्षी सरासरी 9 सेंटीमीटर आणि मुलींची उंची 8 सेंटीमीटर वाढायला लागते. 12-13 वर्षे वयापासून मुलींचा विकास व्हायला सुरुवात होते. तो 18 वर्षांपर्यंत पूर्ण होतो. मुलांचा विकास पूर्ण होण्यास दोन वर्षे अधिक लागतात. म्हणजेच त्यांचा विकास 20 वर्षांपर्यंत पूर्ण होतो. या वयात व्यायाम केल्याने शरीराचा नैसर्गिक विकास वेगाने होतो आणि चरबी वाढत नाही. 

व्यायाम : 5 ते 10 वर्षे वयामध्ये हाडांचा पूर्ण विकास होत नाही. अशावेळी वजन उचलण्याचा व्यायाम करू नये. उलट धावणे, पोहणे आणि सायकल चालवण्यासारखा सोपा व्यायाम करावा. शाळेतील क्रीडा स्पर्धेतही सहभाग घेणे गरजेचे आहे. 

18 ते 30 वर्षे : शरीराचे योग्य वजन कायम ठेवण्यासाठी हा वयोगट उपयुक्त ठरतो. या वयात मेटाबॉलिक रेट (चयापचयाचे प्रमाण) तीव्र असतो. त्यामुळेच शारीरिक हालचालीदरम्यानच नव्हे, तर विश्रांतर करतानाही कॅलरी जळते. 25 ते 35 वर्षे वयात स्नायू बळकट होतात. 

व्यायाम : एरोबिक्स (प्राणवायू ग्रहणकारी व्यायाम), धावणे, पोहणे, तीव्र गतीने चालणे आणि सायकल चालवणे फायदेशीर ठरेल. तसेच स्नायूंमध्ये लवचीकता कायम ठेवण्यासाठी योगासने फायदेशीर आहेत. 

30 ते 40 वर्षे : जर या वयात तुम्ही सक्रिय नसाल किंवा जास्त करून बैठे काम करत असाल तर दरवर्षी स्नायूंचे एक ते दोन टक्के नुकसान होते. एवढेच नव्हे तर या कालावधीत पीयूष ग्रंथीने सक्रिय होणारी ग्रोथ हार्मोनची पातळीही कमी होते. हा हार्मोन स्नायू आणि हाडे बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. या हार्मोनची पातळी कमी असल्याने दुखापतग्रस्त स्नायू बरे होण्यास वेळ लागतो. 

व्यायाम : लीड्स मेट्रोपॉलिटन विद्यापीठातील आरोग्य व व्यायाम विषयाचे तज्ज्ञ लुइस सुटॉन यांच्या मते, वेट ट्रेनिंग (जड वस्तू उचलण्याचा व्यायाम) आणि एरोबिक्सच्या मदतीने शरीर सडपातळ होते. 

40 ते 45 वर्षे : या वयात साधारणत: महिला रजोनिवृत्तीतून जातात. यामुळे प्रत्येक वर्षी त्यांच्या हाडांची एक टक्के हानी होते. यादरम्यान होणा-या हार्मोनल बदलांमुळे वजन वाढण्याचीही समस्या उद्भवते. अशावेळी महिलांना सडपातळ राहणे कठीण जाते. अशा स्थितीत नियमित व्यायाम केल्याने संभाव्य दुष्परिणाम टाळता येतात.
थोडे नवीन जरा जुने