खूप दुखत असेल किंवा सुज आली असेल तर, 'ह्या' आयुर्वेदिक टिप्स एकदा वाचाच !


सामान्य जीवनात लहान मोठ्या दुर्घटना घडणे साधारण गोष्ट आहे. अश्या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जखम होऊ शकते. अनेक वेळा खुप जोरात लागलेले असते अशात पेनकिलर खाऊन सुध्दा आराम मिळत नाही. 

जर तुम्हालाही अशा समस्या येत असतील, दुखणे किंवा सूज असेल तर अशात निर्गुण्डी पेक्षा चांगले कोणतेच औषध नाही. याचे रोप भारतात आणि विशेषतः गरम प्रदेशात पाहायला मिळते.

या प्रकारच्या रोपांचा सुंगंध डार्क असतो. याचा सर्वात जास्त उपयोग सुज कमी करण्यासाठी केला जातो. अशा प्रकारची सूज कमी करण्याचे अनेक प्रकार आहेत.

पध्दती


१. या रोपांच्या पानांना पाण्यात उकळा. जेव्हा पाण्यातुन वाफ निघेल तेव्हा भांड्यावर जाळी ठेवा. दोन छोटे कपडे पाण्यात भिजवुन पिळुन घ्या. नंतर हे एका नंतर एक जाळीवर ठेवुन गरम करा. सुज किंवा दुखणा-या ठिकाणी ठेवुन शेकुन घ्या. मुरगलेला किंवा मुका मार लागलेले, कंमबर दुखी, गॅसमुळे दुखणारे पोट, संधीदुखी यासारख्या दुखण्यावर हे एक चांगला उपाय आहे. कफ, ताप किंवा फुफ्फुसातील सुज दुर करण्यासाठी या पानांचा रस काढा, हा रस २ मोठे चमचे, २ ग्राम बारीक केलेले पिपल मिळवुन दिवसातुन दोनवेळा प्या. पानांना गरम करुन पाठ किंवा छातीवर बांधल्याने आराम मिळतो.

२. मोहरच्या तेलामध्ये ओवा आणि लसुन जाळुन त्या तेलाने मालिश केल्याने प्रत्येक प्रकारचे दुखणे दुर होऊ शकते.

३. अकरोडच्या तेलाने मालिश केल्याने आखडलेले हात-पाय चांगले होतात.

४. लसुनची एक पाकळी चावल्यानंतर त्याच्या रसाला आपल्या लाळ सोबत मिळवुन गुळण्या करा. यामुळे तुमची दात दुखी बंद होईल.

५. सुंठ, मिरे, बावडिंग आणि सेंदा मिठ यांचे समान प्रमाणात चूर्ण बनवा, सकाळी ५ ग्राम पाण्यासोबत सेवन करा.

६. १०० ग्राम निर्गुंडीचे बीज बारीक करुन याच्या १० पुड्या बनवा. सकाळी लवकर उठुन शुध्द तुप आणि गुड मिळवु पीठाचा हलवा बनवा. त्यामध्ये एक पुडी मिलवा. हे सेवन केल्यावर झोपुन जा, यावर पाणी पिऊ नका. गुडघे आणि कंबर दुखीला आराम मिळेल.


७. ओवा तव्यावर भाजुन घ्या आणि काळे मीठ मिळवुन त्याची पावडर बनवा. २-३ ग्राम पाण्यासोबत दिवसातुन तीन वेळा याचे सेवन केल्याने पोट दुखीपासुन आराम मिळतो.

८. जी-याला तव्यावर शेका आणि २-३ ग्राम प्रमाण घेऊन पाण्यासोबत दिवसातुन तीन वेळा सेवन करा. हे चावुन खाल्ल्यानेसुध्दा आराम मिळतो.

९. जर एसिडीटीमुळे पोट दुखी होत असेल तर पाण्यात थोडे मीठ आणि सोडा टाकुन सेवन केल्यास लाभ होईल.
थोडे नवीन जरा जुने