तुम्ही जर भोपळा खाण्याचे टाळत असाल तर "हे" नक्की वाचाच.


जेवणात दुधी भोपळ्याचा समावेश करणे आणि त्याचा रस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, दुधी भोपळा आरोग्याशी निगडित अनेक समस्यांचे निवारण करण्यात फायदेशीर आहे. 

विशेषत: मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांना याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. विविध आजारांवर गुणकारी असलेल्या दुधी भोपळ्याच्या काही अशाच फायद्यांबाबत जाणून घ्या

भोपळ्यात कॅलरी आणि फॅटचे प्रमाण खूप कमी असते आणि डायटरी फायबर खूप जास्त असतात. भोपळ्यात 96 टक्के पाणी असते. यामध्ये लोह, ‘क’ जीवनसत्त्व आणि बी-कॉम्प्लेक्स मोठय़ा प्रमाणात असते. 100 ग्रॅम भोपळ्यात 1.8 मि.ग्रा. सोडियम आणि 87 मि.ग्रा. पोटॅशियम असते. उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी हे फळ खूप फायदेशीर आहे.


भरपूर पाणी असल्याने हे फळ सहज पचते. पोटाशी संबंधित विविध आजार जसे अल्सर आणि अपचनाच्या तक्रारी दूर करण्यात भोपळा फायदेशीर आहे. वातावरणात अधिक उष्णता असल्यास भोपळ्यामुळे आराम मिळतो.


यामुळे मूत्रपिंडविषयक आजार बरे होतात. ज्या लोकांना लघवी करताना जळजळ होते, त्यांनी जेवणात भोपळ्याचा समावेश करावा. तसेच भोपळ्याचा रस नियमितपणे घ्यावा.


एक ग्लास भोपळ्याच्या रसात थोडेसे मीठ घालून सेवन केल्याने घामाच्या माध्यमातून सोडियम नष्ट होऊ शकणार नाही. शरीरात सोडियमची पातळी कमी असल्याने थकवा जाणवतो आणि खूप तहान लागते.

सकाळी सर्वात आधी भोपळ्याचा रस घेतल्याने अकाली केस पांढरे होण्याची समस्या दूर होते.


अनिद्रेची समस्या दूर करण्यासाठी भोपळ्याच्या रसात तिळाचे तेल मिसळून झोपण्यापूर्वी डोक्याची मालिश करावी.


यकृताची कार्यप्रणाली चांगली ठेवण्यासाठी भोपळा खूप फायदेशीर आहे.
थोडे नवीन जरा जुने