केशर खाण्याचे हे १४ फायदे वाचून चकित व्हाल,गरोदरपणात केशर आहे खूपच फायदेशीर !क्रॉकस सॅटायव्हस या वनस्पतीच्या सुकवलेल्या किंजल्कांपासून म्हणजे फुलामधील स्त्रीकेसरापासून केशराची निर्मिती होते. हे स्त्रीकेसर वाळवले की केशर तयार होते. ज्या फुलापासून केशराची निर्मिती केली जाते त्या फुलांचा रंग फिकट जांभळा असतो. 


एका फुलापासून केवळ तीनच केशर काढले जातात. १ किलो केशराची निर्मिती करायची झाल्यास साधारणत: ३ लाख फुलांची आवश्यकता असते. उत्पादनाच्या अल्पतेमुळे बाजारात केशराची किंमत अधिक असते. त्यामुळे ब-याचदा केशरात भेसळदेखील केली जाते.

आशिया खंड, स्पेन, इजिप्त, ग्रीस, तुर्कस्थान येथे मोठया प्रमाणावर लागवड होते. भारतात काश्मीर येथे मोठया प्रमाणात लागवड होते. पिक्रो क्रोसीन नावाचा स्वादकारक घटक असतो. याचा गडद पिवळट, लाल रंग असून त्याला काहीसा कडवट आणि उत्तेजक स्वाद असतो. गोड पदार्थात रंग आणि स्वाद येण्यासाठी याचा अधिक वापर केला जातो. शक्तिवर्धक असून कित्येक औषधांमध्ये याचा वापर केला जातो. केशराचे औषधी गुण बरेच आहेत.

डोकेदुखीपासून आराम हवा असल्यास केशर उपयुक्त ठरते. चंदन आणि केशराचा लेप करून तो कपाळावर लावल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो.

नाकातून रक्त वाहत असल्यास चंदन आणि केशराचा लेप नाकावर लावल्याने रक्त येणे ताबडतोब बंद होते.
लहान मुलांना सर्दी होत असल्यास केशराचं दूध प्यायला दिल्याने त्वरित आराम पडतो.
केशर पचनक्रिया सुधारते तसंच गॅस आणि अ‍ॅसिडिटी यासारख्या विकारांवरही उपयुक्त ठरते.
अतिसार होत असल्यास केशर, आंब्याची कोय, जायफळ आणि सुंठ यांचं मिश्रण लावल्यानं आराम पडतो.
महिलांसाठी केशर अतिशय फायदेशीर आहे. मासिक पाळीची अनियमितता, त्या दरम्यानची पोटदुखी, गर्भाशयाला सूज आदी विकारांवर अतिशय गुणकारी आहे.

हिस्टेरियासारख्या आजाराला नियंत्रित ठेवण्यासाठीदेखील केशर फायदेशीर ठरतं.

खरचटल्यावर किंवा जखम झाल्यामुळे त्वचा निघाल्यास केशराचा लेप लावल्यावर त्वचा लवकर येते.

दुधाबरोबर केशराचे सेवन केल्यामुळे शारीरिक शक्ती वाढते.

निद्रानाशाची समस्या असलेल्यांनी केशरयुक्त दुधाचं सेवन केल्यास हा त्रास कमी होतो.

केशरातील क्रोसीन या स्वादकारक घटकामुळे ताप उतरण्यासही मदत होते.

केशराचा सगळ्या महत्त्वाचा उपयोग म्हणजे याच्या नियमित सेवनाने मोतीबिंदूसारख्या डोळ्यांच्या तक्रारी यामुळे दूर होतात.

स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यासही केशर उपयुक्त ठरते.

हिरडयांची सूज, जीभ किंवा मुखातील समस्यांवरही हे अतिशय उपयुक्त ठरते.
थोडे नवीन जरा जुने