पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी करा 'हे' उपाय, होईल नक्कीच फायदा !


हे तर सर्वांनीच कधी न कधी ऐकले असेल की, एक ग्लास कोमट पाण्यात थोडासा मध आणि लिंबाचा रस मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास अनेक फायदे होतात. काही जणांच्या मते हे वजन कमी करण्यास सहाय्यक आहे. या साधारण गोष्टींचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडेल की नाही, या विचारात तुम्ही आसल तर आज आम्ही तुम्हाला सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून पिण्याचे काही खास फायदे सांगत आहोत.

पचनक्रिया व्यवस्थित राहते -

डायजेस्टिव प्रॉब्लेममुले तुम्ही त्रस्त असाल तर दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये थोडासा मध आणि लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण प्यावे. यामुळे पोट साफ राहते. लिव्हर चांगले राहते आणि अन्न पचण्यास मदत होते. माधामुळे पोटामध्ये होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून आपले संरक्षण होते

वजन कमी करण्यात सहाय्यक -

मध, लिंबू आणि कोमट पाणी दररोज सकाळी घेतल्यास शरीराचे मेटाबॉलिज्म ठीक राहते. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते. ज्यामुळे दिवसभर गोड खाण्याची इच्छा कमी होते. डायटिंग प्रभावी करण्यासाठी याचे सेवन फायदेशीर ठरते. याचे नियमित सेवन आणि वर्कआउटने लवकर वजन कमी केले जाऊ शकते.

विषारी तत्त्व बाहेर पडतात
मध आणि लिंबाचा रस कोमट पाण्यातून घेतल्यास शरीरातील विषारी तत्त्व बाहेर पडतात. आयुर्वेदानुसार अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे पोटात मृत बॅक्टेरिया एकत्रित होतात. लिंबू पाण्याचे सेवन केल्यास हे किटाणू शरीराबाहेर पडतात. लिंबू पाण्यामुळे पोटाच्या तक्रारींपासून आराम मिळतो.

स्वस्थ त्वचेसाठी -
मध आणि लिंबू कोमट पाण्यातून घेतल्यास शरीरातील टॉक्सिन दूर होतात. हे त्वचेसाठी नैसर्गिक ब्लीचचे काम करते. या व्यतिरिक्त रक्त शुद्ध होते. मधामध्ये अँटीबॅक्टिरिअल तत्व असतात. याच्या नियमित सेवनाने त्वचेवरील पुरळ, पिंपल्स, काळे डाग नष्ट होतात आणि चेहरा उजळ होतो.


इम्यून सिस्टम ठीक करते
मध आणि लिंबू कोमट पाण्यातून पिण्याने शरीराची इम्यून सिस्टिम उत्तम राहण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे अ‍ॅसिडिटी-गॅसेसचे होणारे त्रासापासून आराम मिळतो. याने पोटात होणा-या जंतुसंसर्गापासून रक्षण होण्यास मदत होते. लिंबात व्हिटॅमिन सी आणि एसकॉरबिक अ‍ॅसिड असते. याने पोट साफ राहण्यास मदत होते. यामध्ये अ‍ॅन्टी-इन्फ्लेमेटरी तत्व असल्याने पोटात असणा-या बॅक्टेरियापासून रक्षण होते तसेच सर्दी-खोकला होत नाही.


उर्जा वाढते

भरपुर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असल्याने लिंबू पाणी पिल्याने शरीरातील उर्जेचे प्रमाण वाढते. साइट्रस असणारे फळे (आंबट फळे) शरीरातील उर्जा वाढवण्यास मदतगार ठरतात. त्यामुळे तुम्हाला शाररिक,मानसिक थकवा जानवत असेल तर लिंबू पाणी पिल्याने आराम मिळेल.

 रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्यास मूत्ररोग होत नाहीत. हृदयातील जळजळ कमी होते. वातामुळे उत्पन्न होणार्या आजारांमध्ये कोमट पाणी अमृतासमान फायदेशीर आहे.

- दमा, उचकी, घश्यात जळजळ होणे इ. आजारांमध्ये तसेच तळलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानंतर कोमट पाणी पिणे लाभदायक राहते.

- कोमट पाण्याचे नियमित सेवन केल्यास रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे. कोमट पाण्यामुळे शरीरातील तापमान वाढते. घामाच्या माध्यमातून शरीरातील सर्व विषारी तत्व बाहेर पडतात आणि रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते.


- मुलींचे मासिक पाळीच्या काळात पोट दुखत असेल तर कोमट पाणी प्यावे, आराम मिळेल.

- कोमट पाणी पिणे शरीरासाठी फार उपयोगी राहते, यामुळे शरीरात शक्तीचा संचार होतो. सर्दीचे रुग्ण, अजीर्णाचे रुग्ण, कफप्रकृती व स्थूल व्यक्तींनी नेहमी कोमट पाणी प्यावे.


 चरक संहितेनुसार शरीरात ज्वर (ताप) असेल तर थंड पाणी पिऊ नये. कोमट पाणी प्यावे. तापामध्ये कोमट पाणी जास्त लाभदायक ठरते

- कोमट पाणी त्वचेशी संबंधित समस्या दूर करणारे नैसर्गिक औषध आहे. त्वचा तजेलदार ठेवण्यात कोमट पाण्याची महत्त्वाची भूमिका असते.

- शरीरातील एखाद्या भागात गॅसमुळे त्रास होत असेल तर एक ग्लास कोमट पाणी पिल्यास गॅस बाहेर पडतो.


- वर्तमान काळात पोटाच्या आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. अधिकांश पोटाचे आजार दुषित पाण्यामुळे होतात. आयुर्वेदानुसार पाणीसुद्धा पचावे लागते. त्यामुळे त्यावर अग्निसंस्कार होणे गरजेचे आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने उकळून थंड केलेले पाणी प्यावे. उकळल्यामुळे पाणी निर्जंतूक होतेच, तसेच हलकेही होते.
थोडे नवीन जरा जुने