नैराश्यातून बाहेर पडायचे असेल तर हे नक्की वाचा !


तिच्या आयुष्यात निराशा पसरलेली. तिच्याकरिता जीवनात आता पाहिल्यासारखे काहीच राहिले नव्हते. आधी तिला उत्साहित करणाऱ्या गोष्टींना आता तिच्या आयुष्यात काही अर्थ किंवा जागा उरली नव्हती. काळोख तिचा कायमचा साथीदार झाला कारण तिने स्वतःला परिवार आणि मित्रमैत्रीणींपासून अलिप्त केले. 

नव्या दिवसाचा कसलाही उत्साह उरला नव्हता आणि कधीकधी तिला स्वतःचे आयुष्य संपवून टाकावे हा विचार तिच्या मनात डोकवायचा. पण तिचे तिच्या आई वडिलांवर असणाऱ्या प्रेमामुळे केवळ तिला हिंमत झाली नाही.

“हल्ली माझ्या मनासारखे काहीही घडत नाही. आयुष्य भकास वाटते आणि घट्ट धरून ठेवायला मला कोणताही आधार सापडत नाही. जगातले सगळेजण माझ्याविरुद्ध कटकारस्थान करीत आहेत आणि मी प्रवाहाच्या विरुद्ध झगडते आहे असे वाटते. माझे आयुष्य एकाकी झालेले. माझ्या स्वप्नांचा चुराडा झालेला. मला आता जगण्यासाठी काहीच कारण उरले नाहीये आणि मृत्यूला कवटाळायला अनेक कारणे आहेत. मी एकटी आहे, मी हताश झालेली आहे. मला आता अजिबात सहन होत नाही.", ही एका २३-वर्षीय युवतीच्या डायरीतील नोंद आहे.

नैराश्याच्या काळ्याकुट्ट काळात थोडेफार आधार आहेत ज्यांना पकडून ठेवता येते. हे तुमच्या अडचणींच्या काळात तुमचे आधारस्तंभ ठरतील. खाली दिलेले काही विश्वसनीय आणि कसोटीस उतरलेले मार्ग आहेत जे कठीण काळात तुमचे सच्चे साथीदार असतील आणि तुम्हाला नैराश्यातून बरे आणतील.

नैराश्य तुम्हाला इतके शक्तिहीन करून टाकते की तुम्ही कोणतेही काम करू शकत नाही हे आम्हाला समजते. या कारणामुळे बरे होण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलणे तुम्हाला कठीण होते. तर मग संपूर्ण शिथिल होऊन बरे होण्याची प्रक्रिया सुरु करू या? शिथिल होण्याचे सर्वोत्तम तंत्र आहे ध्यान. हे तर तुम्हाला शिथिल तर करतेच पण त्याशिवाय तुम्हाला ताजेतवानेसुद्धा करते ज्यामुळे इतर तंत्रे करण्यासाठी तुमच्याकडे ऊर्जा येते.

जर तुम्ही काही आघात अनुभवला आहे तर - तुमच्या मनातील दु:खद ठश्यांना हळूहळू पुसून टाकून तुम्हाला बरे करते. तणावामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जेला मुक्तपणे संचार करता येत नाही. 

ध्यान केल्याने ऊर्जेच्या वाहिन्यातील अडथळा बनलेला तणाव काढून टाकते. आनंद, उत्साह आणि प्रेम यांनी तुम्हाला पुनःप्रभारित करते.

“ध्यान तुम्हाला तुमचे मन शांत करण्यात मदत करते आणि तुम्हाला आतून आनंदित करते. ध्यानाद्वारे आणि श्वसन तंत्रांद्वारे अनेक आजारांमध्ये मदत होऊ शकते. 

अनेक लक्षणीय संशोधन हे दर्शविते की ध्यानामुळे परिस्थितीत आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, झोपेचे त्रास आणि मज्जासंस्थेचे आजार अश्या आजारांपासून मुक्ती मिळते.
थोडे नवीन जरा जुने