व्यायामासाठी वेळ मिळत नसेल, तर घरातील कामांमध्येच व्यायाम शोधा.व्यायामासाठी वेळ मिळत नसेल, तर घरातील कामांमध्येच व्यायाम शोधावा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील.


घरातील कामे स्वत:च करा : तुमच्या घरी नोकरचाकर असतील, तरीही घरातील काही कामे स्वत:च करावीत. उदा. कचरा उचलणे, कपडे धुणे इत्यादी.

साफसफाई : घराच्या साफसफाईची जबाबदारी स्वत: घ्यावी. घरातील कानाकोपर्‍याची सफाई करावी. छताचे कोपरेही स्वच्छ करता येतील. असे करताना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. गादीखालची धूळही स्वच्छ करावी. फर्निचर हटवून साफसफाई केल्यास आपोआपच व्यायाम होईल.

सुटीच्या दिवशी स्वच्छता : रविवारी सुटीच्या दिवशी घरकाम करणार्‍या लोकांना सुटी द्यावी आणि आपल्या जोडीदारासोबत घराची साफसफाई करावी. असे केल्यास दिवसभरात तुमचा चांगला व्यायाम होईल.

कपडे धुणे : आज घरोघरी वॉशिंग मशिन्स आहेत; परंतु काही कपडे हातांनीच धुवावे लागतात. आठवड्यातील एक दिवस कपडे धुण्याची जबाबदारी स्वीकारावी. यामुळे तुमच्या हातांचा चांगला व्यायाम होईल आणि कपडेही चांगले धुऊन निघतील. कपडे धुण्यामुळे पोटाचा व्यायाम होतो. जर कपडे पिळण्यासाठी त्रास होत असेल, तर जोडीदाराची मदत घ्यावी.

तंदुरुस्त राहणे सोपे : घरातील आणि बाहेरील कामे एकाचवेळी करणे सोपे नाही; परंतु ही कामे केल्यास निश्चितच तुम्ही तंदुरुस्त राहाल.
थोडे नवीन जरा जुने