हिवाळ्यात फिट राहण्यासाठी "ह्या" काही खास टिप्स !


हिवाळ्यात बरेच लोक एकतर वेळेवर व्यायाम करत नाहीत किंवा एक-दोन दिवस व्यायाम केल्यानंतर आळस करतात. त्यामुळे येथे काही टिप्स दिल्या आहेत. त्याचा वापर करून पाहा.

घरीच करा व्यायाम


या दिवसात मैदानावर, जिममध्ये जाणे होत नसेल तर तुम्ही घरच्या घरीदेखील व्यायाम करून स्वत:ला तंदुरुस्त ठेऊ शकता. घरात एकाच ठिकाणी दोरीवर उड्या मारणे किंवा एकाच जागेवर व्यायाम करू शकता. शिवाय योगासनेदेखील करू शकता. अशाप्रकारे कोणत्याही फिटनेस मशीनविना आपण आपले व्यक्तिमत्त्व आणखी चांगले करू शकता.

नवीन गोष्टी शिका


दररोज जिममध्ये जाऊन किंवा व्यायाम करून लोक कंटाळतात. अशावेळी स्वत:ला इतर प्रकारच्या गतिविधीमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करायला हवा. नवीन काम आपल्याला प्रेरित करेल आणि प्रत्येक काम करण्यास उत्साह वाढेल. आपण मॅरेथॉनमध्ये भाग घेऊ शकता, नृत्य किंवा मार्शल आर्टचे वर्ग घेऊ शकता.

मित्रांंना सोबत घ्या


तुम्ही तुमच्या मित्रांसोबत व्यायाम करू शकता. ज्या ठिकाणी आपण जातो त्यालाही तेथे बोलवू शकता. दोघेही एकमेकांना व्यायाम करण्यासाठी प्रेरित करतील. त्यामुळे आपणही व्यायामापासून जीव काढणार किंवा आपल्यालाही कंटाळा येणार नाही. कारण तुमचा मित्र तुम्हाला व्यायाम करण्यास प्रवृत्त करत राहील.

थोडे नवीन जरा जुने