आपल्याला वेळ पुरत नाही ? वेळेचे नियोजन करतांना फॉलो करा ह्या टिप्स !


वेळेच्या व्यवस्थापनासंबंधी असे म्हणता येईल की, कमी महत्त्वाच्या गोष्टींवर आपण ८० टक्के वेळेचा वापर करून २० टक्के परिणाम मिळवतो, तर महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपण फक्त २० टक्के वेळ घालवतो. त्यामुळे आपल्याला वेळ पुरत नाही. वेळेचे नियोजन करतांना पुढील बाबी लक्षात घेतल्यास ते करणे सोपे जाईल.

१. उद्दिष्टे ठरवा.

२. त्यातील दीर्घकालीन आणि लगेच साध्य होणारी उद्दिष्टे वेगळी करा.

३. आता तुमच्याकडे असणार्‍या प्रलंबित कृती आणि पुढे करावयाच्या कृती यांची सूची करा.

४. या सूचीचे तातडीची आणि महत्त्वाची कामे, तातडीची पण कमी महत्त्वाची कामे, महत्त्वाची पण कमी तातडीची कामे आणि इतर असे वर्गीकरण करा.

५. त्यातील तातडीची आणि महत्त्वाची कामे करण्यासाठी प्राधान्य द्या. त्यानंतर पुढच्या क्रमाची कामे हाती घेतल्यास नियोजन सोपे जाईल.

६. प्रत्येक वेळी उपलब्ध वेळेचा सदुपयोग कसा करू, याचा विचार करा. प्रतीक्षा वेळ ही देणगी समजा.

७. हाती घेतलेले काम अधिकाधिक पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

८. प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐका, उदा. एखादा निरोप घेतांना, तो आपल्याला नीट समजला आहे ना, याची खातरजमा करून घ्या.

९. एखाद्या व्यक्तीला निरोप देतांना त्याला तो नीट समजला आहे ना, याची खातरजमा करून घ्या.
थोडे नवीन जरा जुने