तुम्हाला म्हातारपण येऊ देणार नाही 'हे' फळ...वाचा सविस्तर


ज्युसने शरीराला त्वरीत ऊर्जा प्राप्त होते. परंतु बीट ज्युस ऊर्जा तर प्रदान करतोच शिवाय त्यात म्हाता-याला जवान बनविण्याची चमत्कारी शक्ती असते. 

बीट ज्युस रक्तवाहिन्यांना सक्रीय करतो. यामुळे शारीरिक सक्रियतेवेळी मांसपेशींना ऑक्सिजनची फार आवश्यकता पडत नाही.

वय वाढण्याबरोबर तुमची कार्यशीलता, चपळता कमी होऊ लागली असेल तर रोज एक ग्लास बीट ज्युस घ्या. वाढत्या वयाच्या लोकांच्या धमण्यांचे होणारे आकुंचन थांबविण्याची शक्ती या ज्युसमध्ये आहे.


बीट ज्युसमध्ये आढळणारा नाईट्रेट ब्लड प्रेशर कमी करतो. हाय ब्लड प्रेशर असणा-यांसाठी बीट ज्युस वरदान आहे.

बीटमध्ये आढळणारा अ‍ँटीऑक्सिडेंट हा पदार्थ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवितो. हा एक नैसर्गिक शर्करा मिळण्याचा स्रोत आहे. यात सोडियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, क्लोरिन, आयोडीन आणि अन्य महत्त्वाची जीवनसत्वे असतात. 

बीटमध्ये किडनी आणि पित्ताशय स्वच्छ ठेवण्याची शक्ती असते. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास किंवा अर्धा ग्लास बीट ज्युस घ्या.

किडनी आणि पित्ताशय विकारांमध्ये बीट ज्युस आणि गाजर ज्युस एकत्रित करून पिणे आरोग्यदायी असते. पांढरे बीट पाण्यात उकडवून हे पाणी फोड, जळजळ आणि तोंड येणे यासाठी उपयुक्त आहे.

ताप आणि थंडीतही उपयुक्त आहे. म्हणून सदैव तारुण्य टिकवायचे असल्यास बीटचे नियमित सेवन करा.
थोडे नवीन जरा जुने