उत्तम आरोग्य हवे असेल तर "ह्या" गोष्टी करा !


प्रत्येक घरामध्ये काम करणारी आई कामामध्ये एवढी व्यग्र असते की, तिला स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ नसतो. त्यात ती नोकरदार असेल तर घड्याळाच्या काट्यावर तिला नाचावे लागते. 


घरातील कामे त्यामुळे आपल्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत असते. यामुळे तिच्या आणि पर्यायाने मुलाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याशी संबंधित या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

1. पुरेसे पाणी प्या 
शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल असेल तर डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. त्यामुळे दिवसातून कमीत कमी १० ते १२ ग्लास पाणी अवश्य प्यावे. भूक शमवण्यासाठी शीतपेये किंवा आइस्क्रीम इत्यादींचे सेवन करण्याऐवजी फळांचे सेवन करा किंवा फळांचा रस घेणेदेखील फायद्याचे ठरू शकते. 

2. पौष्टिक आहार घ्या 
संतुलित आहार म्हणजेच प्रथिने, जीवनसत्त्वे आणि भरपूर मिनरल्स असलेला आहार प्रतिकार क्षमता वाढवतो. आहारामध्ये फॅट आणि कार्बोदकांचे प्रमाण कमीच ठेवा. यामुळे वजन वाढू शकते. कार्यालयामध्ये चहा, कॉफीचे सेवन करण्याऐवजी फळांचा रस पिणे तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल. 

3. व्यायाम करा 
दररोज सकाळी उठल्यानंतर व्यायाम अवश्य करा. ध्यानधारणा करणेदेखील तुमच्यासाठी चांगले ठरेल. शक्य झाल्यास सकाळी मॉर्निंग वॉक करत जा. कार्यालयामध्ये लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. आपल्या दिनचर्येत हे बदल केल्यास लवकरच त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागतील.
थोडे नवीन जरा जुने