वजन नियंत्रणात ठेवायचं ? कोरफडीचा रस 'ह्या' ट्रीक्सने पिल्यास फायदा होईलसौंदर्यवृद्धीसाठी नैसर्गिक साधनांची म्हणजे झाडांची खूप मदत होते. योग्य माहिती घेऊन, या झाडांचा योग्य वापर केल्यास आरोग्याला फायदेच होतात. कोरफड ही अशीच बहुविध वनस्पती आहे. आयुर्वेदात या वनस्पतीला अनन्य साधारण महत्व आहे. हि वनस्पती आपल्या देशात सगळीकडे उगवते. 


कोरफडीची पाने जाड, मांसल आणि काटेरी असतात. कोरफडीचे पान कापल्यानंतर त्यातून पिवळ्या रंगाचा चिकट द्रव्यपदार्थ बाहेर पडतो. हा रस आटवला जावू शकतो, त्याचा वापर आरोग्यासाठी केला जातो. मात्र, गर्भवती महिला, पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांनी मात्र याचे सेवन करू नये.

बहुउपयोगी : 

आयुर्वेदात कोरफडीचे खूप उपयोग सांगितले आहेत. यामध्ये डोळ्यांचे आजार, पोटातील काही आजार जसे कि वायू होणे, कमजोर नजर, पचनसंबंधी विकार, यकृताचे आजार, स्थूलपणा, त्वचारोग, रक्ताचे विकार, मासिक पाळीच्या समस्या, चरबीच्या गाठी होणे आणि त्वचेचा दाह या सारख्या सर्व आजारामध्ये कोरफडीचा उपयोग होतो.

कोरफडीचे गुण : 

कोरफड रोज खाल्ली जाते. कोरफडीत १८ अमिनो असिड्स, बी कॉम्प्लेक्स, ए, सी, ए ही जीवनसत्वे असतात तसेच लोह, केलशिअम, मैग्नेशीअम, झिंक यासारखे अनेक घटक असतात. कोरफडीत असणारे जीवाणू प्रतिबंध करणार्या गुणामुळे कोरफड खुप गुणकारी समजली जाते. कोरफड शरीरात असणारे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, यामुळे शरीराला नवीन शक्ती मिळत राहते.

वजन घटवणे : 

रोज १५-२० मिलीलीटर कोरफडीचा रस पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. या रसात थोडा मधही घालू शकता. कोरफडीत असणारी काही घटक वजन कमी करण्यास मदत करतात व अशक्तपणा न येऊ देता उर्जा टिकवून ठेवतात. यामुळे वजन कमी करण्याच्या हा एक उत्तम उपाय आहे.

पोट जड किंवा वायू होणे : 

कोरफडीचा गर रोज सकाळी एक चमचा सेवन केल्यास पोटात वायू धरणे हि समस्या कमी होते. कोरफडीचा गर त्यात अर्धा कप एरंडाचे तेल, अर्धा कप चिरलेला कांदा आणि अर्धा कप साखर हे सर्व एकत्र करा. मंद आचेवर चांगले उकळून घ्या. घट्ट चटणीसारखे होऊपर्यंत हे मिश्रण उकळावा. त्यानंतर थंड झाल्यावर ते झाकून ठेवा. त्रास होत असताना झोपण्यापूर्वी एक-दोन चमचे हे मिश्रण खावे.
थोडे नवीन जरा जुने