धरणात उडी घेऊन शेतकऱ्याने संपविले जीवन


हिंगोली :- सेनगाव तालुक्यातील लिंबाळा तांडा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून येलदरी धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. मुलीच्या बोळवणीसाठी पैसे नाहीत, शिवाय बँकेचे कर्ज कसे फेडावे यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. 

प्रेमदास रंगनाथ राठोड (४०) यांना लिंबाळा तांडा शिवारात ३५ आर शेती आहे. पेरणीसाठी त्यांनी सेनगावच्या एसबीयकडून ७४ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. रब्बी हंगामातही पेरणीसाठी पैसा नाही. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला होता. त्यातच मुलगी माहेरी आली होती. मुलगी व जावाई बुधवारी गावी जाणार होते. त्यांच्या बोळवणीसाठी पैसे नव्हते. त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. सायंकाळी पाच वाजता त्यांनी येलदरी धरणात उडी मारून आत्महत्या केली.
थोडे नवीन जरा जुने