नियती आपल्याशी का खेळते . . ?


कधीकधी असं वाटू लागतं की नियती आपल्याशी खेळ करत आहे. कधी त्रास होतो, कधी अपेक्षाभंग कधी निराशही व्हायला होतं. आपल्याच वाट्याला हे असं का. आपण कुणाचं काय बिघडवलं. 

आपलं नशिबच फुटकं आहे का, असे अनेक प्रश्न मनात येतात. कुणी त्यातूनही संघर्ष करतो तर कुणी नैराश्याच्या गर्तेत जातो. एखादा संयम राखू शकतो पण एखादा त्या काळात कोलमडून पडतो. 

पण, असा प्रसंग आपल्या वाट्याला आला तर आपण शांत राहायला हवं. अशावेळी खेळचं उदाहरण घ्यावं. आपल्याला जर असं वाटत असेल की, नियत है आपल्याशी खेळत आहे, अवघड डाव टाकत आहे, वगैरे वगैरे तर सोबत हेही लक्षात असू द्यावं की, त्याच खेळडूपुढे आव्हानं मोठी असतत, जो खेळाडू जास्त चांगला असतो.
थोडे नवीन जरा जुने