जर का तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर रोज प्या हा चहा


मुंबई : जर का तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल पण तरीही तुमचं वजन कमी होत नसेल तर चिंता नको. ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. वजन जितकं झपाट्याने वाढत असतं पण कमी होताना ते खूप हळूहळू कमी होतं. त्याचसाठी आज आम्ही तुम्हांला २ नॅचरल ड्रिंक्सबद्दल माहिती सांगणार आहोत.

 हे नॅचरल ड्रिंक्स प्यायल्यावर तुमचं वजन कमी होण्यास खूप फायदा होतो. फक्त रात्री झोपण्यापूर्वी याचं सेवन करावं आणि काही दिवसांमध्ये तुम्हांला शरीरातली चरबी कमी होताना जाणवेल.

हे हर्बल ड्रिंक्स तुमच्या मेटाबॉलिक रेटचा वेग वाढवण्यासाठी काम करते. मेटाबॉलिक रेटचा वेग वाढल्याने डायजेशन प्रोसेस आणखीन चांगली आणि फास्ट होता. आयुर्वेदिक चिकित्सक डॉक्टर संजय सिंह सांगतात की, मेटाबॉलिक रेट चांगला होण्यासोबतच तुमचं डायजेशन देखील चांगलं असणं गरजेचं आहे.त्याचवेळी वजन की होऊ शकते.

मग जाणून घ्या जर का तुम्हांला वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी सर्वांत पहिलं आपलं डायजेशन प्रक्रिया नीट असावी. हीच आपल्या वजन कमी करण्याची पहिली पायरी आहे. हे २ ड्रिंक्स तुमचं वजन कमी करण्यासोबतच पचनतंत्र देखील चांगले करते. त्यामुळे तुमचं वजन कमी करण्याचं मिशन यशस्वी होते.

१) दालचिनी चहा

दालचिनी एक असं औषध आहे ज्यामध्ये आरोग्याची संपत्ती आहे. जर का आपण रात्री दालचिनी चहा प्यायल्यात तर समजून जा की आपल्या मेटाबॉलिक रेटशी संबंधित प्रत्येक समस्या निघून जाईल. दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबायोटिक्सची वैशिष्ट्ये आहेत. दालचिनी शरीराला डिटॉक्स करण्यासोबतच अन्य काही आजार देखील ठिक करते. दालचिनी मूड बूस्टर चहा असून त्यासोबत हृदयापासून डोक्यापर्यंत सगळ्यासाठी चांगली मानली जाते.

चहा बनवण्याची कृती

एक कप पाणी उकळवून त्यात एक चमचे दालचिनी पावडर घालावी. सुमारे अर्धा तास झाकून ठेवा. अर्धा तासांनंतर त्यात एक चमचे मध घालून ते प्या. तुम्हांला हवं असल्यास पुन्हा ते गरब करू शकता. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला ही चहा प्यायल्याने तुमचे वजन कमी होईल.

२) मेथीची चहा

मेथीचे दाणे सहजपणे तुमच्या शरीरातील चरबी वितळवू शकते. मेथीचे दाणे शरीरात उष्णता निर्माण करतात जे वजन कमी करण्यासाठी आवश्यक आहे. विशेष म्हणजे उष्णता निर्माण करणारे बीज एंटाएसिडसारखं काम करतात. मेथी डायजेशन ठिक करण्यासोबत अॅसिडीटीची समस्या देखील दूर होते. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास ही चहा प्यावी. आपल्याला महिन्याभरात चहाचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.

चहा बनवण्याची कृती

प्रथम, मेथीच्या दाणे दळून घ्यावे. त्यानंतर ते उकळत्या पाण्यात घालून झाकून ठेवावे. जवळपास ५ मिनिटं झाकून ठेवण्यानंतर यातले पाणी गाळून रोज एक प्यावे. या पाण्यामुळे शरीरातील फॅट बर्न होण्यास मदत होते.

जर का तुम्हांला आरोग्याशी संबंधित काही समस्या असेल किंवा दररोज औषधं सुरू असतील तर चहा पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. त्यासोबतचं गर्भवती महिलांनी या चहाचं सेवन डॉक्टरांच्या सल्लाशिवाय करू नये.
थोडे नवीन जरा जुने