प्रोसेस्ड आणि डबाबंद फूड खाण्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवा !प्रोसेस्ड आणि डबाबंद फूड कमी खावं. कारण यात अधिक प्रमाणात मीठ असतं. अशा खाद्य पदार्थांची एक यादी तयार करा, जे बघताच तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेव शकत नाही. असे पदार्थ खाण्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवा. 


आपल्या आहारात मिठाच्या स्त्रोतांचा हिशोब लावा. पदार्थांची खरेदी करताना लेबलवरील माहिती वाचा.

कोणताही विचार न करता खाण्याची सवय जर तुम्हाला असेल, तर ती आधी बदला.  कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी यामुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे, याचा विचार करा.

फायदा - नुकसान लक्षात घेऊनच पदार्थाची निवड करा. ही सवय स्वतःला लावली, तर प्रोसेस्ड फूडपासून दूर राहणं अवघड नाही.

एक यादी तयार करा. त्यावर प्रोसेस्ड फूड खाण्याचे फायदे आणि नुकसान लिहा.
थोडे नवीन जरा जुने