काळ्या मिर्यांचा 'असा' करा उपयोग, कोरड्या खोकल्यापासून आराम मिळेल.


अत्यंत त्रासदायक हा कोरडा खोकला कोणत्याही ऋतूमध्ये होऊ शकतो. साधारण श्वासनलिकांच्या अनेक साधारण आजारांमध्ये कोरडा खोकला आढळतो. या खोकल्यात कफाच प्रमाण नसत.  फक्त घसा कोरडा पडतो व खोकला येतो. यासाठी खालील घरगुती उपाय केल्यास आराम मिळेल.

गायीच्या दुधाचे तूप १५-२० ग्रॅम आणि १०-१२ काळे मिरे एका वाटीत गरम करत ठेवावे. काळे मिरे फुटायला लागतील तेव्हा गॅसवरून खाली उतरून घ्यावे व थोडे थंड करून त्यात २० ग्रॅम खडी साखर वाटून मिक्स करा. त्यानंतर हे काळे मिरे खाण्यास द्या.

याचे सेवन केल्यानंतर एक तास काही खायचे-प्यायचे नाही. एक-दोन दिवस नियमित घेतल्यास कोरडा खोकला बरा होईल. कोरड्या खोकल्यात हळदीचे सेवनसुद्धा लाभदायक ठरते. तसेच काळी मिरी गरम दुधात मिसळून ते दूध घेतल्यास फायदा होतो.
थोडे नवीन जरा जुने