थोड्या थोड्या प्रमाणात जेवण केल्याने शरीराला मिळतात इतके फायदे !


बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा म्हणते की, ‘मी नैसर्गिक स्लिम असून दर दोन तासाला काही ना काही खात राहते. यामुळे माझी पचनक्रिया चांगली राहते आणि दिवसभर ऊर्जा मिळते.’ 

आपल्या शरीराच्या प्रकारानुसारच आहार घेतला पाहिजे, असा सल्ला तरुणींमध्ये प्रसिद्ध असलेल्या अनुष्का शर्माने दिला आहे. 

सेलिब्रिटी घेतात म्हणून आपणही डोळे बंद करून तसा आहार घेता कामा नये. त्याऐवजी एखाद्या प्रमाणित प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आहार व व्यायामाचे वेळापत्रक बनवावे, असे सल्लाही अनुष्काने दिला आहे.

वजन कमी करण्यासाठी आहार कमी करणे योग्य नाही. कारण त्यामुळे अशक्तपणा येतो. त्याचप्रमाणे वजन वाढवण्यासाठीदेखील जास्त जेवण न करता ते थोड्या थोड्या प्रमाणात करावे. वजन कमी करण्यासाठी जशी अधिक मेहनतीची गरज असते त्याचप्रमाणे सडपातळ व्यक्तीलादेखील वजन वाढवण्यासाठी अधिक मेहनतीची गरज असते. याउलट असे न केल्यास अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. कसे ते जाणून घेऊया.

उपाशी राहणे हा उपाय नाहीतज्ज्ञांच्या मते, पुरेशा पोषक द्रव्यांच्या अभावामुळे शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्यासुद्धा परिणाम भोगावे लागतात. पोषक द्रव्यांच्या कमतरतेमुळे खालील प्रकारचे दुष्परिणाम पाहायला मिळतात.

जास्त जेवण्याची शक्यता
 ताणतणाव
शारीरिक थकवा
 थोडेसे कष्ट केल्यास दम लागणे
 स्नायू कमजोर होणे
 रक्त कमी होणे
 त्वचेची चमक जाणे
 केस गळणे

ही स्थिती लागोपाठ दोन आठवड्यांपर्यंत कायम राहिल्याने मेटाबॉलिक सिंड्रोम जसे उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि अँसिडिटी यामुळे पेप्टिक अल्सर होण्याची शक्यता वाढते.

अन्न पचवण्यासाठी
पचनक्रिया चांगली राहत नसेल तर दिवसातून चार-पाच वेळा संतुलित आहार घ्यावा. दररोज दोन-तीन वेळा लिंबू पाणी प्यावे. जेवणात दोन केळी, 250 ग्रॅम शेंगदाणे किंवा शेंगदाणा चिक्कीचे सेवन करवे. हे सर्व पदार्थ दोन जेवणांमध्ये घेता येतील. तथापि, यापासून 500 ते 600 अतिरिक्त कॅलरी मिळेल. तज्ज्ञांच्या मते कॅलरी जाळण्यासाठी लठ्ठ असलेल्या लोकांनी वेगाने चालावे आणि सडपातळ लोकांनी 15-20 मिनिटे सामान्यपणे चालावे. दररोज नियमित चालल्यानेदेखील पचनक्रिया चांगली राहते.

हे लक्षात ठेवा
वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याऐवजी जेवणातील कॅलरी नियंत्रित ठेवावी.
गोड, तळलेले आणि मेदयुक्त खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे. हे पदार्थ पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते.

प्रत्येक जेवणात 3-4 चमचे तेल/तुपाचा समावेश करावा.

 लठ्ठ लोकांनी जेवणापूर्वी आणि नंतर एक ग्लास पाणी प्यावे. यामुळे जेवण जास्त जाणार नाही आणि भूकही लवकर मिटेल. सडपातळ लोकांनी जेवणापूर्वी पाणी पिऊ नये.

थोडे नवीन जरा जुने