करार यादीतून वगळले, धोनी थेट मैदानात उतरला!


रांची : बीसीसीआयने वार्षिक कराराच्या यादीतून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे नाव वगळले आहे. तरी ही  धोनी पुन्हा एकदा कामाला लागला आहे. धोनीने आगामी आयपीएलची तयारी सुरु केली आहे. धोनी गुरुवारी झारखंडच्या रांची स्टेडियममध्ये सराव करताना दिसला. 

महेंद्रसिंह धोनीचा गुरुवारी झारखंड रणजी संघासोबत सराव सुरु आहे. रांची स्टेडियममध्ये सराव करत असताना झारखंडच्या संघाने लाल चेंडूसोबत तर धोनीने पांढऱ्या रंगाच्या चेंडूसोबत सराव केला. 

भारतीय क्रिकेट विश्वातील महेंद्रसिंह धोनी हे एक मोठं नाव आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाला सर्वाधिक प्रमाणात यश मिळालं. धोनीच्या नेतृत्वाने भारताला टी-20 आणि वनडे दोन्ही सामन्यांचा विश्वकप जिंकून दिला. 

मात्र, आता धोनी निवृत्तीच्या वाटेला असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याशिवाय बीसीसीआयने वार्षिक कराराच्या यादीतूनही धोनीचे नाव वगळले आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे.
थोडे नवीन जरा जुने