खजूरला पोषक तत्वांचे भांडार, हे आहेत खजुराचे शरीरासाठी फायदे


मुंबई : खजूरला पोषक तत्वांचे भांडार असल्याने वंडर फ्रुट मानले जाते. यात लोह, मिनरल, कॅल्शियम, अमिनो अँसिड, फॉस्फरस आणि व्हिटामिन्स मोठ्या प्रमाणात असतात. खजूर आरोग्यासाठी जितके पोषक असतात तितकेच त्वचेच्या सुंदरतेसाठीही पोषक असतात.

खजुरामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोजसोबत इम्युनिटी पॉवर बुस्ट करण्यासाठी लागणारी पोषक तत्वेही असतात. यात कोलेस्ट्रॉल नसते. एका खजुरातून २३ कॅलरी उर्जा मिळते. यासोबतच सेल डॅमेज, कॅन्सरपासून बचाव होतो तसेच हृदयाशी संबंधित आजारही बरे होतात.

वजन वाढवण्यासाठी फायदेशीर

खजुरामध्ये साखर, प्रोटीन आणि व्हिटामिन्स असल्याने खजूर वजन वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. असं म्हणतात खजुर आणि काकडी एकत्र खाल्ल्याने वजन संतुलित पद्धतीने वाढते.

त्वचा उजळते

खजुरामध्ये व्हिटामिन सी आणि डी असल्याने त्वचेचा सैलपणा कमी करते. खजुरामुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. यासोबतच त्वचा कोमल बनते. खजुरामधील अँटी एंजिग गुण असल्याने शरीरात मेलॅनिन नावाचे तत्व साचू देत नाही. ज्यामुळे त्वचा चमकदार होते.

दररोज सकाळी भिजवलेले खजूर खाल्ल्याने फायदा होतो. यातील तत्व पाचनशक्ती सुधारतात.

दातांचे आरोग्य टिकवण्यासाठी गरजेचे असलेल्या फ्लोरिनशिवाय खजुरामध्ये लोह असते. खजुराच्या नियमित सेवनाने शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते.

थोडे नवीन जरा जुने